उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

Posted On: 17 SEP 2026 7:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन उद्या, शुक्रवार 18 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्रात, मुंबई, लोणावळा आणि पुण्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यादरम्यान ते सकाळी मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतील. दुपारी उपराष्ट्रपती लोणावळा येथे कैवल्यधाम येथील गोर्धनदास सेकसरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या हीरक महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहतील.

संध्याकाळी सी. पी. राधाकृष्णन पुण्यातल्या नेहरू क्रीडासंकुलामधील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित 38 व्या पुणे महोत्सवाला उपस्थित राहतील.

राधिका अघोर/नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2311599) अभ्यागत कक्ष : 7