पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी भारतीयांना मोठी स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठीच्या वाढत्या संधी कशा सक्षम करत आहेत,यावर प्रकाश टाकणारा लेख सामाईक केला

Posted On: 17 SEP 2026 5:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू यांचा एक लेख सामाईक केला. या लेखात, गेल्या 12 वर्षांत भारतीयांच्या नवीन पिढीला आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे संधी आणि मार्ग उपलब्ध झाले आहेत, याचे विश्लेषण करण्यात आले आहे.

मोदी म्हणाले की, हा लेख अधोरेखित करतो की भारतात गुणवत्तेची कधीच कमतरता नव्हती; मात्र आता, वाढत्या संधींमुळे भारतीयांना केवळ मोठी स्वप्ने पाहणेच नव्हे, तर ती स्वप्ने प्रत्यक्षात आणणेही शक्य होत आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे --

“भारतात गुणवत्तेची कधीच कमतरता नव्हती. मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या संधी आणि मार्गांचाच अनेकदा अभाव होता.

आपल्या या मार्मिक लेखामध्ये, @Pvsindhu1 यांनी गेल्या 12 वर्षांत परिस्थिती कशी बदलली आहे, याचे वर्णन केले आहे. यामुळे भारतीयांच्या नवीन पिढीला केवळ मोठी स्वप्ने पाहणेच नव्हे, तर ती स्वप्ने सत्यात उतरवणेही शक्य झाले आहे.”


राधिका अघोर/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2311563) अभ्यागत कक्ष : 8