विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीएसआयआर – एनआयएससीपीआर द्वारे सरलएआय चा वापर करून वैज्ञानिक संशोधन व्यापक जनसमुदायापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न

Posted On: 15 SEP 2026 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2026

सीएसआयआर म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च (एनआयएसआयआर – एनआयएससीपीआर) ने वैज्ञानिक संवादाला बळकटी देण्यासाठी सरल एआय  चा वापर करण्याचे नवीन पाऊल उचलले आहे. सरल एआय हा अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन, एएनआरएफ, नवी दिल्ली यांचा एक उपक्रम आहे, ज्याद्वारे त्यांच्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले संशोधन आकर्षक आणि सहज समजण्याजोग्या व्हिडिओंच्या स्वरूपात रूपांतरित केले जाते.

विज्ञान आणि संशोधनाच्या प्रभावी संवादासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याला सरकारने दिलेल्या प्राधान्यानुसार हा उपक्रम राबवला जात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी अलीकडेच संस्थांना 'सरल एआय' वापरण्यासाठी प्रोत्साहित केले आहे आणि सीएसआयआर – एनआयएसआयआर – एनआयएससीपीआर ही संस्था याचा वापर करण्यात आघाडीवर आहे.

एनआयएसआयआर – एनआयएससीपीआर च्या संचालिका डॉ. गीता वाणी रायसम यांच्या नेतृत्वाखाली, ही संस्था विज्ञान संवादाची व्याप्ती आणि प्रभाव वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा सक्रियपणे शोध घेत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, एनआयएससीपीआर  ने अलीकडेच 'सरल एआय वर आधारित एक प्रात्यक्षिक कार्यशाळा  आयोजित केली होती, ज्यामध्ये जर्नल्सचे संपादक आणि संशोधकांसह 90 हून अधिक सहभागींनी भाग घेतला. एनआयएसआयआर – एनआयएससीपीआर च्या संचालिका डॉ. गीता वाणी रायसम म्हणाल्या की, जेव्हा वैज्ञानिक ज्ञान संशोधन समुदायाच्या पलीकडे पोहोचते, तेव्हा त्याचे मूल्य अधिक वाढते. 'सरल एआय' सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून, एनआयएसआयआर – एनआयएससीपीआर,  भारतीय संशोधन अधिक सुलभ करण्यासाठी आणि ते व्यापक व विविध प्रकारच्या जनसमुदायापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

वैज्ञानिक ज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यावर आणि संशोधन समाजासाठी अधिक सुलभ करण्यावर अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन  ने भर दिल्यामुळे   या उपक्रमाला चालना मिळाली आहे. एनआयएससीपीआर  च्या भेटीदरम्यान, एएनआरएफ  चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवकुमार कल्याणरामन यांनी 'सरल एआय' बद्दल माहिती दिली; हे प्रकाशित संशोधन-निबंधांवरून छोटे व्हिडिओ तयार करण्याचे एक साधन आहे. त्यांनी संस्थेला 'सरल एआय' चा वापर करून गुंतागुंतीचे वैज्ञानिक संशोधन सोपे करण्यास आणि ते सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यास प्रोत्साहित केले. एएनआरएफ चे सीईओ, अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवकुमार कल्याणरामन म्हणाले की, संशोधन केवळ प्रकाशनापुरते मर्यादित राहू नये. 'सरल एआय' सारखी साधने संशोधक आणि संस्थांना त्यांचे कार्य संशोधन-निबंधांच्या पलीकडे नेण्यास, ते अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास आणि भारतीय संशोधनाचा प्रभाव वाढवण्यास मदत करू शकतात. या उपक्रमाचा उद्देश विशेषतः विद्यार्थी आणि सामान्य जनतेसाठी वैज्ञानिक संशोधन शोधणे, समजून घेणे आणि ते सामायिक करणे अधिक सुलभ करणे हा आहे.हे व्हिडिओ एका समर्पित यूट्यूब प्लेलिस्टद्वारे (यूट्यूब प्लेलिस्ट लिंक - https://www.youtube.com/playlist?list=PLb4FmdATtzOs) उपलब्ध करून दिले जात आहेत, ज्यामुळे संशोधनाला पारंपरिक शोधनिबंधांच्या पलीकडे जाऊन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक अतिरिक्त डिजिटल माध्यम उपलब्ध होत आहे.

नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2310867) अभ्यागत कक्ष : 6