अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सहावी अखिल अधिकृत भारतीय भाषा परिषद आणि हिंदी दिनानिमित्ताने देण्यात आलेल्या ‘राजभाषा कीर्ती’ पुरस्कार 2025-26 या वर्षांचे वित्तीय सेवा विभागाने पटकावले प्रथम पारितोषिक


राजभाषा हिंदीत 2025-26 या वर्षांत केलेल्या उत्कृष्ट अंमलबजावणी आणि नाविन्यपूर्ण कामगिरीबद्दल पुरस्कार

Posted On: 14 SEP 2026 7:28PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2026

वित्तीय सेवा विभागाला राजभाषा क्षेत्रात उत्कृष्ट अंमलबजावणी आणि नाविन्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल 'राजभाषा कीर्ती पुरस्कार' 2025-26 अंतर्गत (300 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या मंत्रालये/विभागांच्या श्रेणीत) प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली, गृह मंत्रालयाच्या अधिकृत भाषा विभागाने आयोजित केलेल्या  सहाव्या अखिल भारतीय अधिकृत भाषा परिषद आणि हिंदी दिवसा'निमित्ताने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही परिषद 14-15 सप्टेंबर 2026 रोजी सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे पार पडली.

वित्तीय सेवा विभागाच्या वतीने, अतिरिक्त सचिव हरी हर मिश्रा यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारला. या परिषदेला देशभरातील विविध मंत्रालये/विभाग आणि राजभाषा क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राजभाषा विभागातर्फे प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार, वित्तीय सेवा विभागाला सन 2025-26 दरम्यान राजभाषा हिंदीची उत्कृष्ट अंमलबजावणी, प्रभावी वापर आणि नाविन्यपूर्ण कामगिरीबद्दल देण्यात आला‌ आहे. राजभाषेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केलेले उल्लेखनीय प्रयत्न, विभागात हिंदीचा जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दलआणि शासकीय कामात हिंदीच्या नाविन्यपूर्ण व सर्जनशील वापरास चालना दिल्याबद्दल हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्यात आला.


माधुरी पांगे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2310287) अभ्यागत कक्ष : 5