भारतीय निवडणूक आयोग
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार तीन दिवसीय भूतान दौऱ्यावर
भूतानचा राष्ट्रीय मतदार दिन आणि निवडणूकविषयक सहकार्य चर्चेच्या केंद्रस्थानी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूतान भेटीदरम्यान भारत-भूतान निवडणूकविषयक सहकार्यावर भर
Posted On:
14 SEP 2026 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2026
1. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे 14 ते 16 सप्टेंबर 2026 दरम्यान भूतानचा तीन दिवसीय दौरा करत आहेत.
2. या दौऱ्यादरम्यान ज्ञानेश कुमार आज, 14 सप्टेंबर 2026 रोजी थिम्फू येथे भूतानच्या राजांची भेट घेणार आहेत.
3. या दौऱ्यातील प्रमुख कार्यक्रमांपैकी एक म्हणजे 15 सप्टेंबर 2026 रोजी पारो येथील जिग्मे सिंग्ये वांगचुक स्कूल ऑफ लॉ येथे आयोजित करण्यात येणारा भूतानचा राष्ट्रीय मतदार दिन सोहळा होय. या कार्यक्रमाला मुख्य निवडणूक आयुक्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
4. 16 सप्टेंबर 2026 रोजी ज्ञानेश कुमार थिम्फू येथे भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे यांची भेट घेणार आहेत. तसेच ते भूतानच्या वरिष्ठ नागरी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
5. या दौऱ्यामुळे भारताचा निवडणूक आयोग आणि भूतानचा निवडणूक आयोग यांच्यातील सातत्यपूर्ण संवादाच्या आधारावर दोन्ही संस्थांमधील घनिष्ठ संस्थात्मक सहकार्य आणखी बळकट होईल.
शैलेश पाटील/हेमांगी काणेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2310285)
अभ्यागत कक्ष : 6