पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीतल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची इथियोपियाच्या फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिकच्या पंतप्रधानांशी भेट

Posted On: 12 SEP 2026 11:16AM by PIB Mumbai

 

भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आयोजित 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इथियोपियाच्या फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिकचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली यांची भेट घेतली.

दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने चर्चा केली. त्यांनी आर्थिक सहकार्य, संरक्षण आणि सुरक्षा भागीदारी तसेच क्षमता बांधणी यासह प्रमुख क्षेत्रांमधल्या प्रगतीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदींच्या डिसेंबर 2025 मधल्या ऐतिहासिक आदिस अबाबा दौऱ्याच्या आधारावर ही बैठक झाली.

दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही विचारांची देवाणघेवाण केली. त्यांनी बहुपक्षीय मंचांवर घनिष्ठ सहकार्यासाठी आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.

18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत इथियोपियाच्या सहभागाबद्दल पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आणि त्यांच्या उपस्थितीमुळे 'ग्लोबल साउथ'चा सामूहिक आवाज अधिक बळकट व्हायला मदत झाली, असे नमूद केले.

***

हर्षल अकुडे/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2309670) अभ्यागत कक्ष : 4