महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्या कन्या झहरा पेझेश्कियन यांचे ब्रिक्स बाजारात केले स्वागत

Posted On: 12 SEP 2026 7:34PM by PIB Mumbai

 

महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय हस्तकला संग्रहालयात आयोजित ब्रिक्स बाजारात इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्या कन्या झहरा पेझेश्कियन यांचे स्वागत केले.

एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांनी सादर केलेल्या समृद्ध परंपरा, कला, हस्तकला आणि सांस्कृतिक वारशाची माहिती देत त्यांना बाजाराची पाहणी करून देण्याची संधी मिळाली.

ब्रिक्स बाजार हा कला, कारागिरी आणि सांस्कृतिक संबंधांचा सुंदर उत्सव असून, त्यातून ब्रिक्स देशांना परस्परांच्या अधिक जवळ आणणाऱ्या सांस्कृतिक संबंधांना चालना मिळते, असेही त्यांनी सांगितले.

***

शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2309572) अभ्यागत कक्ष : 10