पंतप्रधान कार्यालय
आगा खान विकास नेटवर्कचे अध्यक्ष प्रिन्स रहीम अगा खान पाचवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
पंतप्रधानांनी भारताच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांमध्ये एके डीएनच्या दीर्घकालीन योगदानाचे केले कौतुक
वारसा संवर्धन आणि पुनर्स्थापनेच्या क्षेत्रातील नेटवर्कच्या कार्याचे पंतप्रधानांकडून कौतुक
आगा खान यांनी भारताच्या सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक प्रगतीसाठी एके डीएनची व्यक्त केली बांधिलकी
Posted On:
10 SEP 2026 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2026
आगा खान विकास नेटवर्कचे (एके डीएन) अध्यक्ष प्रिन्स रहीम आगा खान पाचवे यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी भारतातील एके डीएनच्या दीर्घकालीन योगदानाचे कौतुक केले. शाश्वत शहरी विकास, जलसंवर्धन, आरोग्यसेवा, ग्रामीण स्वच्छता, युवकांचे कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये नेटवर्कने दिलेल्या योगदानाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
देशभरातील ऐतिहासिक स्थळांची पुनर्स्थापना आणि पुनरुज्जीवन करून भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी एके डीएनने केलेल्या प्रयत्नांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.
प्रिन्स रहीम आगा खान यांनी भारताच्या सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक प्रगतीसाठी एके डीएनची बांधिलकी पुन्हा व्यक्त केली. भारताच्या परिवर्तनशील विकास उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले; तसेच मानवकल्याणाला पुढे नेण्यासाठी नवोन्मेषाच्या भूमिकेबाबत आपले विचार व्यक्त केले.
सुवर्णा बेडेकर/गजेंद्र देवडा /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2308943)
अभ्यागत कक्ष : 14