शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते ‘भारत इनोव्हेट्स 2026’ वरील विशेष स्मरणिकेचे अनावरण


देशाच्या विकासयात्रेत नवोन्मेष, संशोधन, तंत्रज्ञान आणि उद्योजकता केंद्रस्थानी असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन

Posted On: 09 SEP 2026 9:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच नवोन्मेष, संशोधन, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेला देशाच्या विकासाच्या प्रवासाच्या केंद्रस्थानी ठेवले असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. भारत आणि फ्रान्स नवोन्मेष वर्षाअंतर्गत 14 ते 16 जून 2026 या कालावधीत फ्रान्समधील नीस  इथे भारत इनोव्हेट्सच्या पहिल्या पर्वाचे आयोजन केले गेले होते. या आयोजनाचे दस्तऐवजीकरण असलेल्या ‘भारत इनोव्हेट्स 2026’ या विशेष स्मरणिकेचे आज नवी दिल्ली इथे प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

भारत इनोव्हेट्स या  उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकांना आपल्या क्षमता जगासमोर मांडण्याची आणि जागतिक पटलावरील भागधारकांशी जोडले जाण्याची संधी मिळाली. यातून पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाच दिसून येतो असे जोशी यांनी सांगितले. भारत इनोव्हेट्ससारख्या उपक्रमाच्या माध्यमातून युवा भारताच्या आकांक्षा आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडते, यासोबतच  देशभरातील उच्च शिक्षण तसेच संशोधन परिसंस्थेची क्षमताही यातून सिद्ध होते असे त्यांनी सांगितले. ज्यावेळी युवा प्रतिभेला संधी दिली जाते,  उद्योग आणि जागतिक व्यवस्थेशी जोडले जाते, त्यावेळी काय साध्य केले जाऊ शकते, याची प्रचिती भारत इनोव्हेट्स या उपक्रमातून आल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजुमदार यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधला विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यात उच्च शिक्षण संस्थांची भूमिका महत्वाची असल्याची मांडणी त्यांनी आपल्या संवादातून केली.

या स्मरणिकेमध्ये ‘डीप टेक’  क्षेत्रातील देशभरातील आश्वासक नवोन्मेषकांचा शोध घेण्यापासून ते त्यांची निवड करण्यापर्यंतचा, तसेच नीस इथल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातील त्यांच्या सहभागापर्यंतच्या भारत इनोव्हेट्सच्या प्रवासाचे दखलपूर्ण दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. यासोबतच या उपक्रमाअंतर्गतचा सहभाग, संवाद आणि फलनिष्पत्तीबद्दलची माहितीही यात आहे.

भारत इनोव्हेट्स हा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम आहे. देशभरातील उच्च शिक्षण आणि संशोधन परिसंस्थेतून उदयाला येत असलेल्या डीप टेक क्षेत्रातील उच्च क्षमतेच्या नवोन्मेषाचा शोध घेणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. नवोन्मेषकांना उद्योग, गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांशी जोडणे, तंत्रज्ञान हस्तांतरणाला गती देणे तसेच जागतिक बाजारपेठ आणि पुरवठा साखळीचा अनुभव उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमाअंतर्गत केला जातो.

प्रयोगशाळेपासून ते बाजारपेठेपर्यंतची तसेच शैक्षणिक संकुलापासून ते प्रत्यक्ष जगापर्यंतची वाटचाल कोणत्याही अडथळ्याशिवाय होईल अशा पद्धतीची सोय उपलब्ध करून देणे हा  भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाच्या पहिल्या पर्वात डीप टेक क्षेत्रातील देशभरातील 120 स्टार्टअप्स आणि नवोन्मेषक सहभागी झाले होते. यासोबतच देशभरातील 45 संशोधन प्रकल्प देखील या उपक्रमात मांडण्यात आले होते. या माध्यमातून या सगळ्यांना त्यांच्याकडील तंत्रज्ञान जगाला दाखवण्याची, या क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणुकदारांशी संवाद साधण्याची तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि बाजारपेठेतील संधीच्या शक्यतांचा शोध घेण्याची संधी मिळाली.

या स्मरणिकेत या संपूर्ण प्रवासाचे दखलपूर्ण दस्तऐवजीकरण केले गेले आहे. यासोबतच या स्मरणिकेतून भारतातील विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, स्टार्टअप्स, उच्च शिक्षण संस्था आणि डीप टेक परिसंस्थेतील भागीदारांची वैज्ञानिक क्षमता, त्यांच्यातील उद्योजकतेची भावना आणि नवोन्मेषाची क्षमताही ठळकपणे अधोरेखीत केली गेली आहे.

सुवर्णा बेडेकर/ तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2308532) अभ्यागत कक्ष : 9