संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत- मोरोक्को यांच्यातील संरक्षण सहकार्यावर नव्याने भर: नवी दिल्लीत उद्घाटनपर संयुक्त संरक्षण समितीची बैठक

Posted On: 08 SEP 2026 10:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2026

भारत आणि मोरोक्को यांच्यातील, उद्घाटनपर म्हणजेच पहिली संयुक्त संरक्षण समितीची बैठक, नवी दिल्लीत आज, म्हणजेच 8 सप्टेंबर 2026 रोजी झाली. या बैठकीत दोन्ही बाजूंनी, प्रशिक्षण आणि शिक्षण, शांतताविषयक ऑपरेशन्स, संरक्षण युद्धसराव, वैद्यकीय सहकार्य, सायबर संरक्षण आणि संरक्षण उद्योग अशा क्षेत्रातील परस्पर हितांच्या मुद्यांवर चर्चा केली.  तसेच, दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध 2027 साली, 70 व्या वर्षात प्रवेश करत असतांना, लष्करी सहकार्य वाढवण्यावर त्यांनी भर दिला.

या बैठकीचे सह-अध्यक्षपद, संरक्षण मंत्रालयातील आंतरराष्ट्रीय सहकार्य विभागाचे संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद आणि मोरोक्कोच्या रॉयल सशस्त्र दलाच्या दुसऱ्या ब्युरोचे प्रमुख ब्रिगेडियर जनरल अब्देल्लाह अथ्मानी यांनी भूषवले.

भारतीय शिष्टमंडळात संरक्षण विभाग, तिन्ही सैन्यदल, एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालय, संरक्षण उत्पादन विभाग, सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालनालय, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी सहभागी झाले होते.

मोरोक्कोचे शिष्टमंडळ सप्टेंबर सात ते 10 या काळात भारत भेटीवर आले आहे. ब्रिगेडियर जनरल अब्देल्लाह अथ्मानी यांनी आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करून केली. मोरोक्कोच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीतील डीपीएसयू भवन इथे संरक्षण उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधून भारताच्या वाढत्या संरक्षण उत्पादन क्षमतेची प्रत्यक्ष माहिती घेतली. दोन्ही बाजूंनी सह-उत्पादन, संयुक्त उपक्रम, तंत्रज्ञान सहकार्य, देखभाल आणि दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी आवश्यक सहकार्य या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संधींचा शोध घेण्यास सहमती दर्शवली. हे शिष्टमंडळ लष्करी रुग्णालयालाही ( संरक्षण आणि रेफरल) भेट देणार असून भारताच्या लष्करी वैद्यकीय क्षमतांची माहिती घेणार आहेत.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या मोरोक्को दौऱ्यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये,  संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या दौऱ्यामुळे भारत-मोरोक्को द्विपक्षीय संरक्षण संबंधांना नवी गती मिळाली. संयुक्त संरक्षण समितीची  बैठक ही या कराराअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या संस्थात्मक यंत्रणेचा एक भाग आहे.


शैलेश पाटील/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2308093) अभ्यागत कक्ष : 5