पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी जन्माष्टमीनिमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छा


पंतप्रधानांनी भगवान श्रीकृष्णाच्या दिव्यत्वाचे प्रतीक म्हणून नमन करणारे सुभाषित केले सामायिक

Posted On: 04 SEP 2026 2:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जन्माष्टमीच्या पावन प्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी भगवान श्रीकृष्णाप्रति आपली गाढ श्रद्धा व्यक्त करणारे एक सुभाषित सामायिक केले आहे.

'एक्स' वरील संदेशांच्या मालिकेत पंतप्रधानांनी म्हटले आहे:

"आपणा सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य संदेशांमध्ये नि:स्वार्थ कर्माची अद्भुत प्रेरणा सामावलेली आहे, ज्याने मानवतेला निरंतर मार्ग दाखवला आहे. त्यांच्या भक्ती आणि उपासनेला समर्पित असलेला हा पवित्र प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि शक्तीचा संचार करो, हीच प्रार्थना. जय श्रीकृष्ण!"

 

"वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।

देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्॥"

वसुदेवाचा पुत्र, दिव्यत्वाचे प्रतीक, कंस आणि चाणूर यांचा विनाश करणारा, माता देवकीला परम आनंद देणारा आणि संपूर्ण जगताचा गुरु असलेल्या भगवान श्रीकृष्णाला मी वंदन करतो.

 

* * *

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2306697) अभ्यागत कक्ष : 5