भूविज्ञान मंत्रालय
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने 'मायगव्ह' च्या सहकार्याने पृथ्वी प्रणाली विज्ञान आणि लोकसेवेची 20 वर्षे साजरी करण्यासाठी आयोजित केली ऑनलाइन राष्ट्रीय प्रश्नमंजूषा
Posted On:
01 SEP 2026 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2026
वैज्ञानिक उत्कृष्टता, नाविन्य आणि राष्ट्रसेवेची दोन दशके पूर्ण झाल्यानिमित्त, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने 'मायगव्ह' च्या सहकार्याने 'पृथ्वी विज्ञान मंत्रालय स्थापना दिन प्रश्नमंजूषा: पृथ्वी विज्ञानाची प्रगती, राष्ट्राचे सक्षमीकरण' सुरू केली आहे. 'विकसित भारत 2047' या राष्ट्रीय ध्येयाशी सुसंगत राहून, हवामान आणि वातावरण अभ्यास, समुद्रशास्त्र, ध्रुवीय प्रदेशांचा अभ्यास आणि भूकंपशास्त्र यांसारख्या क्षेत्रांत भारताने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि मंत्रालयाचा 20 वा वर्धापन दिन साजरा करणे, हा या देशव्यापी ऑनलाइन स्पर्धेचा उद्देश आहे.
प्रश्नमंजूषेचे स्वरूप आणि रचना
'पृथ्वी विज्ञान मंत्रालय स्थापना दिन प्रश्नमंजूषा' ही एक आकर्षक आणि मर्यादित कालावधीसाठी स्पर्धा आहे. भारताच्या पृथ्वी विज्ञान क्षेत्रातील कामगिरीबद्दल सहभागींची जागरूकता तपासण्यासाठी ही स्पर्धा आखण्यात आली आहे:
- स्वरूप: 100 बहुपर्यायी प्रश्न.
- वेळेची मर्यादा: 300 सेकंद (5 मिनिटे).
- व्यासपीठ : केवळ 'मायगव्ह' पोर्टलद्वारे उपलब्ध (प्रवेशासाठी प्रमाणीकरण/लॉगिन आवश्यक).
- प्रयत्न: प्रत्येक सहभागीला केवळ एकदाच प्रवेश करता येईल. (नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा ईमेल आयडीद्वारे).
पारितोषिके आणि प्रोत्साहन
सर्व वयोगटांतील आणि क्षेत्रांतील लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढवण्यासाठी मंत्रालयाने काही प्रमुख पारितोषिके जाहीर केली आहेत:
- रोख बक्षिसे: 300 सेकंदांच्या कालावधीत सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या आणि (यादीतून) निवडल्या जाणाऱ्या पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी 10,000 रुपये दिले जातील.
- प्रमाणपत्रे: प्रश्नमंजूषा यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रत्येक सहभागीला सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र त्वरित मिळेल, जे आपोआप डाउनलोड करता येईल.
निवड निकष आणि मार्गदर्शक तत्त्वे
सहभागी होवू इच्छिणारे उमेदवार अधिकृत 'मायगव्ह' प्रश्नमंजूषा पोर्टलला भेट देऊन आणि त्यांच्या नोंदणीकृत 'मायगव्ह' श्रेयांकनाचा किंवा प्रमाणीकरण तपशीलांचा वापर करून लॉग इन करून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
- पात्रता: भारतातील सर्व नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे. मात्र यामधून पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि ‘मायगव्ह’ चे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कर्मचारी आणि त्यांचे निकटवर्तीय कुटुंबीय वगळण्यात आले आहेत.
- पारदर्शक निवड प्रक्रिया: पूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांच्या पात्र गटातून विजेत्यांची निवड स्वयंचलित आणि प्रणालीद्वारे रँडम म्हणजेच यादृच्छिक पद्धतीने केली जाईल.
- प्रोफाईल पडताळणी: सहभागींनी त्यांचे 'मायगव्ह' प्रोफाईल अद्ययावत ठेवावे, असे आवाहन केले आहे, कारण बक्षीस वितरणापूर्वी वैध ओळख पडताळणी आवश्यक आहे.
* * *
सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2305755)
अभ्यागत कक्ष : 10