शिक्षण मंत्रालय
शिक्षण मंत्रालयाने 2026-27 या वर्षाकरीता राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवली
Posted On:
01 SEP 2026 7:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2026
राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत (NMMSS) 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (NSP) अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर, 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. वाढवलेली कालमर्यादा खालीलप्रमाणे आहे:
|
माहिती
|
वाढवलेली तारीख
|
|
अर्ज करण्याची अंतिम तारीख
|
30.09.2026
|
|
नोडल अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्याची अंतिम तारीख I
|
अंतिम तारीख 15.10.2026
|
|
जिल्हा नोडल अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्याची अंतिम तारीख
|
31.10.2026
|
एनएसपी पोर्टल 1 जून 2026 पासून विद्यार्थ्यांसाठी अर्ज सादर करण्याकरिता खुले झाले आहे. या प्रकल्प वर्षात, म्हणजेच 2026-27 मध्ये, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एनएसपीवर केवळ - एकदा नोंदणी (OTR) करावी लागेल, त्यानंतर त्यांना त्यांनी निवडलेल्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
दरवर्षी या योजनेद्वारे विविध राज्य/केंद्रशासित प्रदेशांतील सरकारांनी आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या इयत्ता नववीच्या एक लाख विद्यार्थ्यांना नव्याने शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कामगिरीच्या आधारावर, ही शिष्यवृत्ती इयत्ता दहावी ते बारावीपर्यंत दरवर्षी नूतनीकरण करून सुरू ठेवली जाते. ही योजना केवळ राज्य सरकारी, सरकारी अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच लागू आहे. शिष्यवृत्तीची रक्कम प्रति विद्यार्थी प्रति वर्ष 12,000 रुपये आहे.
एनएमएमएसएस शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) द्वारे रकमेचे इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण केले जाते. शिष्यवृत्ती मिळवण्यासाठीच्या पात्रतेच्या निकषांमध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न रु 3.50 लाखांपेक्षा जास्त नसावे, शिष्यवृत्तीसाठीची निवड परीक्षा देण्याकरिता इयत्ता सातवीच्या परीक्षेत किमान 55% गुण किंवा समकक्ष श्रेणी असणे आवश्यक आहे (अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 5% ची सवलत दिली जाते).
* * *
माधुरी पांगे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2305686)
अभ्यागत कक्ष : 8