राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) आपल्या 33 व्या स्थापना दिनानिमित्त मायजीओव्ही (MyGov) वर ऑनलाइन 'मानवाधिकार प्रश्नमंजुषा 2026' सुरू केली
प्रश्नमंजुषा 14 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व भारतीय नागरिकांसाठी 10 ऑक्टोबर 2026 पर्यंत खुली
Posted On:
01 SEP 2026 6:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) आपल्या 33 व्या स्थापना दिनाच्या अनुषंगाने, मायजीओव्ही (MyGov)च्या सहकार्याने आज 'मानवाधिकार प्रश्नमंजुषा 2026: जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि प्रतिष्ठा याचा उत्सव', हा उपक्रम सुरु केला. ही ऑनलाइन प्रश्नमंजुषा 'MyGov' प्लॅटफॉर्मवर 10 ऑक्टोबर 2026 पर्यंत उपलब्ध असेल. 14 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व भारतीय नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे.
मानवाधिकार, 'मानवाधिकार संरक्षण कायदा (पीएचआरए), 1993 आणि देशभरात मानवी हक्कांना प्रोत्साहन आणि संरक्षण देण्यात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग बजावत असलेली भूमिका, त्याचे काम, अधिकार आणि कर्तव्ये यांविषयी जनतेला माहिती करून देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
या स्पर्धेत सहभागींना 300 सेकंदात जास्तीत जास्त 15 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. स्पर्धेच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 15000/-, 10000/- आणि 5000/- रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल. याशिवाय पुढील सात विजेत्यांना प्रत्येकी 2000/- रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येईल.
मानवाधिकार प्रश्नमंजुषेत सहभागी होण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना पुढील लिंक द्वारे मायजीओव्ही (MyGov) पोर्टलवर पाहता येतील:
https://quiz.mygov.in/quiz/human-rights-quiz-2026-celebrating-life-liberty-equality-and-dignity/.
* * *
सुषमा काणे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2305660)
अभ्यागत कक्ष : 8