अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सोने तस्करीविरोधी कारवाईत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 65 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे 42 किलोहून अधिक परदेशी बनावटीचे सोने केले जप्त


कोलकाता, मुंबई, केरळसह देशातील विविध ठिकाणी गुप्तचर माहितीवर आधारित केलेल्या अनेक कारवायांमध्ये 25 जणांना अटक

Posted On: 31 AUG 2026 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑगस्‍ट 2026

 

संघटित सोने तस्करी विरोधातील आपली सातत्यपूर्ण कारवाई सुरू ठेवत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गेल्या काही दिवसांत देशभरात गुप्तचर माहितीवर आधारित केलेल्या अनेक कारवायांच्या मालिकेत एकूण 65 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे 42 किलोहून अधिक परदेशी बनावटीचे सोने आणि सुमारे 10 किलो चांदी जप्त केली आहे. तसेच या कारवाईत 5 परदेशी नागरिकांसह 25 जणांना अटक केली आहे.

या कारवायांमधून तस्करीच्या विविध आणि अत्याधुनिक कार्यपद्धती उघडकीस आल्या आहेत. यात वाहनांमध्ये विशेष पद्धतीने तयार केलेल्या कप्प्यात सोने लपवणे, शरीरात सोने लपवणे, ट्रान्झिट प्रवासी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांचा वापर, तसेच रस्ते मार्गाने आणि सागरी मार्गांनी तस्करी करणे यांचा समावेश आहे.

मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

दिनांक 28/29 ऑगस्ट 2026 रोजी डी.आर.आय.ने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळामार्गे परदेशी बनावटीच्या सोन्याची तस्करी करणाऱ्या एका सुसंघटित टोळीचा पर्दाफाश केला. या टोळीत दुबई, बँकॉक आणि माले यांसारख्या ठिकाणांहून मुंबईमार्गे प्रवास करणारे परदेशी नागरिक तसेच मुंबईत तस्करीचे सोने गुप्तपणे बाहेर नेण्यास मदत करणारा एक विमानतळ कर्मचारी सामील होता. मेणाच्या स्वरूपातील 6.85 किलो वजनाची 24 कॅरेट शुद्धतेची सोन्याची धूळ असलेल्या एकूण 16 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या.

या कारवाईत 6 जणांना अटक करण्यात आली. यात मुंबईमार्गे प्रवास करणारे 5 परदेशी नागरिक आणि एका विमानतळ कर्मचाऱ्याचा समावेश आहे. संघटित टोळ्या तस्करीचे सोने गुप्तपणे बाहेर नेण्यासाठी प्रवासाचे मार्ग आणि विमानतळ कर्मचाऱ्यांचा अधिकाधिक गैरवापर करत आहेत हे या कारवाईतून पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे. 

 

* * *

आशिष सांगळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2305314) अभ्यागत कक्ष : 5