अर्थ मंत्रालय
केंद्र सरकारच्या आर्थिक वर्ष 2026-27 मधील खर्चाचा जुलै 2026 पर्यंतचा मासिक आढावा
Posted On:
31 AUG 2026 7:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2026
केंद्र सरकारच्या जुलै 2026 पर्यंतच्या मासिक खात्यांची माहिती संकलित करून, त्याचा एकत्रित अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :-
भारत सरकारला जुलै 2026 पर्यंत 13,06,709 कोटी रुपये कोटी रुपये इतली प्राप्ती झाली असून, ही रक्कम 2026-27 च्या एकूण प्राप्तीच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 35.8% आहे. यात केंद्राचा निव्वळ कर महसूल 8,44,560 कोटी रुपये, करेतर महसूल 4,23,013 कोटी रुपये, कर्जेतर भांडवली बाजारातली प्राप्ती 39,136 कोटी रुपये यांचा समावेश आहे. या कालावधीत केंद्र सरकारने करांतील वाट्याचे हस्तांतरण म्हणून 3,72,354 कोटी रुपये रक्कम विविध राज्य सरकारांना हस्तांतरित केली आहे.ही रक्कम मागील वर्षापेक्षा 56,190 कोटी रुपयांनी कमी आहे.

भारत सरकारचा एकूण खर्च 17,61,853 कोटी रुपये असून हा 2026-27 च्या संबंधित अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 32.9% आहे. त्यापैकी 13,11,218 कोटी रुपये खर्च महसूल खात्यावर आणि 4,50,635 कोटी रुपये भांडवली आहे. एकूण महसूल खर्चापैकी, 4,26,566 कोटी रुपये व्याज देयकांपोटी आणि 1,53,513 कोटी रुपये प्रमुख अनुदानांपोटी खर्च झाले आहेत.
* * *
सोनाली काकडे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2305192)
अभ्यागत कक्ष : 7