उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींच्या हस्ते अरनमुळा उथ्रिट्टाथी वल्लमकलीचे उद्घाटन; केरळचा समृद्ध सांस्कृतिक वारसा केला साजरा

Posted On: 30 AUG 2026 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑगस्‍ट 2026

 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पंबा नदीवर अरनमुळा उथ्रिट्टाथी वल्लमकलीचे उद्घाटन केले. केरळचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, भक्ती आणि परंपरांचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

केरळ राज्याच्या नुकतेच करण्यात आलेल्या नामांतराबद्दल उपराष्ट्रपतींनी केरळच्या जनतेचे अभिनंदन केले. राज्यसभेचे सभापती म्हणून नुकत्याच झालेल्या अधिवेशनात राज्याच्या नामांतराचे विधेयक मंजूर झाले, त्यावेळी अध्यक्षस्थान भूषवण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ओणमनिमित्त त्यांनी केरळच्या जनतेला शुभेच्छाही दिल्या.

अरनमुळा वल्लमकलीमध्ये सांघिक भावना, शिस्त आणि खिलाडूवृत्ती दिसून येते. ओणम आणि वल्लसाद्य या पवित्र परंपरेशी हा उत्सव जोडलेला आहे. सुंदर सजवलेल्या पल्लियोडम नौकांमध्ये शंभरहून अधिक नावाडी एकाच तालात नौका चालवतात, असे राधाकृष्णन यांनी सांगितले.

अरनमुळाच्या सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करताना, उपराष्ट्रपतींनी तेथील प्राचीन श्री पार्थसारथी मंदिर आणि प्रसिद्ध जीआय मानांकन प्राप्त अरनमुळा कन्नडीचा उल्लेख केला. गेल्या वर्षी उपराष्ट्रपती निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाची आठवण सांगताना, त्यांनी पाहुण्यांना अरनमुळा कन्नडी भेट दिली होती. या सुंदर कलाकुसरीचे पाहुण्यांनी खूप कौतुक केले, असे त्यांनी सांगितले. पुढील पिढ्यांसाठी पारंपरिक कला, हस्तकला आणि ज्ञानपरंपरा जतन करून त्यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

परदेशात काम करणारे लोकही अशा जपलेल्या परंपरांमध्ये सहभागी होण्यासाठी परत येतात. अरनमुळा येथील परंपरा लोकांना त्यांच्या मुळांशी जोडून ठेवतात, असे राधाकृष्णन यांनी सांगितले.

परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घालता येतो, असे राधाकृष्णन यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास भी, विरासत भी या संकल्पनेचा त्यांनी उल्लेख केला. देशातील विविध सण देशाची सांस्कृतिक एकता दर्शवतात. आपली विविधता ही विभाजनाचे कारण नसून, तीच आपल्या शक्तीचा स्रोत आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

* * *

शैलेश पाटील/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304754) अभ्यागत कक्ष : 9