उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राज्यसभा खासदार घनश्याम तिवारी यांच्या "संकल्प से सिद्धी का मोदी युग" या पुस्तकाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन

Posted On: 27 AUG 2026 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑगस्‍ट 2026

 

राज्यसभा खासदार घनश्याम तिवारी यांनी लिहिलेल्या ‘संकल्प से सिद्धी का मोदी युग’ या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथील उपराष्ट्रपती भवनात करण्यात आले.

संकल्प से सिद्धी का मोदी युग’ या पुस्तकातून एक शक्तिशाली आणि प्रेरणादायी संदेश मिळत असल्याचे वर्णन करत सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, की संकल्प ही केवळ एक इच्छा नसून, समर्पण, कठोर परिश्रम आणि शिस्तीने साकारलेला एक दृढ निर्धार आहे. ते म्हणाले की, हे पुस्तक गेल्या बारा वर्षांतील भारताच्या प्रवासाचा मागोवा घेते, ज्यामध्ये प्रशासकीय कामगिरी तसेच वैचारिक पुनर्जागरणाचा समावेश आहे.

स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, केशव बळीराम हेडगेवार, वीर सावरकर आणि अटलबिहारी वाजपेयी यांसारख्या महान राष्ट्रीय विचारवंतांच्या विचारांशी आणि आदर्शांशी समकालीन शासनाला जोडण्याच्या या पुस्तकातील  प्रयत्नावर उपराष्ट्रपतींनी,प्रकाश टाकला आहे.लेखकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सेतुपुरुष’ - स्वप्न आणि वास्तव यांच्यातील पूल - असे समर्पक वर्णन केले आहे, जे या विचारवंतांच्या संकल्पाचा आणि समकालीन भारतातील त्याच्या पूर्ततेशी त्यांचा दुवा साधते, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील प्रमुख घडामोडींचा आढावा घेत सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, की हे पुस्तक राष्ट्र प्रथम, एकात्मिक मानवतावाद आणि अंत्योदय यांच्या भावनेला एकत्र आणते. राष्ट्रीय अखंडता, सामाजिक आणि आर्थिक न्याय, महिला-नेतृत्वाखालील विकास, आत्मनिर्भर भारत आणि पारदर्शक शासन यावरही त्यांनी  प्रकाश टाकला. ते म्हणाले की, हे कार्य राष्ट्रीय विचारांना चिरस्थायी कृतीत उतरवण्याचा एक प्रयत्न करत विविध प्रशासकीय उपक्रमांची माहिती देत वाचकांना भारताच्या यशस्वी प्रवासावर चिंतन करण्यास आणि आत्मविश्वासाने तसेच आशावादाने भविष्याकडे पाहण्यास प्रोत्साहित करते.

या समारंभाला  केंद्रीय कायदा  आणि न्याय आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, राज्यसभा खासदार आणि लेखक  घनश्याम तिवारी उपस्थित होते.

 

* * *

निलिमा चितळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304014) अभ्यागत कक्ष : 10