महिला आणि बालविकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी मानेसर येथील एनएसजी प्रशिक्षण अकादमीमधील पहिल्या महिला कमांडो प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे,'नारी शक्ती'साठी एक अभिमानास्पद टप्पा म्हणून केले कौतुक
Posted On:
27 AUG 2026 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2026
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी मानेसर येथील ‘एनएसजी’ (NSG) प्रशिक्षण अकादमीमध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘पहिल्या महिला कमांडो प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे’ कौतुक केले. हा उपक्रम ‘नारी शक्ती’साठी आणखी एक अभिमानास्पद टप्पा असल्याचे त्यांनी म्हटले.
'X' या समाज माध्यमावर केलेल्या एका टिप्पणीत केंद्रीय मंत्री म्हणाल्या की, "आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली क्षमता, नेतृत्व आणि संधीच्या माध्यमातून नारी शक्तीला खऱ्या अर्थाने सक्षम केले जात आहे." त्यांनी माहिती दिली की, या अभ्यासक्रमांतर्गत राज्य पोलीस दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना शस्त्रे चालवणे, ओलीस ठेवलेल्यांची सुटका करणे आणि दहशतवादविरोधी मोहिमांचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
भारताची नारी शक्ती सर्व अडथळे पार करत आघाडीवर राहून नेतृत्व करत आहे, असेही केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नमूद केले.
* * *
निलिमा चितळे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2304005)
अभ्यागत कक्ष : 9