राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
महाराष्ट्रातील अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात आग लागल्याने तीन नवजात बालकांचा मृत्यू आणि इतर चार जखमी झाल्याच्या वृत्ताची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून घेतली दखल
महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस, या प्रकरणी दोन आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश
या अहवालात जखमी बालकांच्या आरोग्याची स्थिती आणि सरकारने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईच्या वितरणाचा तपशील अपेक्षित
Posted On:
27 AUG 2026 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) महाराष्ट्रातील अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात 24 ऑगस्ट 2026 रोजी आग लागल्याने तीन नवजात बालकांचा मृत्यू आणि इतर चार शिशू जखमी झाल्याच्या वृत्ताची स्वतःहून दखल घेतली आहे. व्हेंटिलेटर मशीनमध्ये झालेल्या स्फोटामुळे ही घटना घडल्याचे वृत्त आहे.
या वृत्तातील मजकूर खरा असल्यास, मानवाधिकार उल्लंघनाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो, असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली असून, या प्रकरणी दोन आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल मागवला आहे. या अहवालात जखमी बालकांच्या प्रकृतीची स्थिती आणि सरकारने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईचे वितरण याबाबतची माहिती अपेक्षित आहे.
25 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या माध्यमांतील वृत्तानुसार, घटना घडली तेव्हा एसएनसीयूमध्ये नऊ शिशू दाखल होते. जखमी झालेल्या चार शिशूंपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303903)
अभ्यागत कक्ष : 14