संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय तटरक्षक दल आणि व्हिएतनाम तटरक्षक दल यांच्यात 7 व्या उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन

Posted On: 26 AUG 2026 1:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑगस्‍ट 2026

 

चेन्नई येथे 25 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि व्हिएतनाम तटरक्षक दल (VCG) यांच्यात 2015 च्या तटरक्षक सहकार्य सामंजस्य कराराच्या चौकटी अंतर्गत 7 व्या उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले.

भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी आणि व्हिएतनाम तटरक्षक दलाचे उप-कमांडंट मेजर जनरल लुओंग दिन्ह हुंग यांनी या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले.

या चर्चेमध्ये समुद्रामधील शोध आणि बचावकार्य, सागरी कायदा अंमलबजावणी, सागरी प्रदूषण नियंत्रण आणि क्षमता बांधणी यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्यावर भर देण्यात आला. दोन्ही बाजूंकडून व्यावसायिक देवाणघेवाण आणि जहाजांना भेटी देण्यासह चालू असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा घेण्यात आला, तसेच सहकार्य आणि आंतर परिचालनक्षमता  वाढवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला.

परस्पर विश्वास, समन्वय आणि परिचालनात्मक सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी नियमित संस्थात्मक संवाद, प्रशिक्षण कार्यक्रम, व्यावसायिक देवाणघेवाण, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण आणि जहाजांच्या भेटी या गोष्टींच्या महत्त्वावर दोन्ही तटरक्षक दलांनी भर दिला.

या उच्चस्तरीय बैठकीने प्रदेशात सागरी सुरक्षा, संरक्षण आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी मैत्री आणि सहकार्याच्या भावनेने एकत्र काम करण्याच्या भारत आणि व्हिएतनामच्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

चालू द्विपक्षीय सहकार्याचा एक भाग म्हणून, 'सहयोग-हॉप टॅक' हा भारत-व्हिएतनाम तटरक्षक दलाचा संयुक्त सराव 27 ऑगस्ट 2026 रोजी समुद्रात आयोजित केला जाणार आहे. हा सराव दोन्ही तटरक्षक दलांना परिचालनात्मक समन्वय वाढवण्याची, परस्पर कार्यक्षमता बळकट करण्याची आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याची संधी प्रदान करेल.

 

* * *

हर्षल आकुडे/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303466) अभ्यागत कक्ष : 13