सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'स्वच्छता पंधरवडा पुरस्कार 2026' वितरण समारंभ

Posted On: 25 AUG 2026 3:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्‍ट 2026

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 1 ते 15 जुलै 2026 या कालावधीत 'स्वच्छता पंधरवडा 2026' यशस्वीपणे साजरा केला. यामध्ये देशभरातील क्षेत्रीय कार्यालयांसह मंत्रालयाचे सर्व विभाग आणि संलग्न, अधीनस्थ आणि  स्वायत्त संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. 'स्वच्छ भारत अभियाना'च्या उद्दिष्टांशी सुसंगत अशा या पंधरवड्यादरम्यान स्वच्छता, कामाच्या ठिकाणची स्वच्छता, अभिलेख व्यवस्थापन, पर्यावरणीय शाश्वतता, कचरा व्यवस्थापन आणि कार्यक्षम कार्यालयीन पद्धती या कामांवर विशेष भर देण्यात आला.

या पंधरवड्यात, मंत्रालयाच्या सर्व कार्यालयांनी आणि क्षेत्रीय घटकांनी विविध उपक्रम राबवले. यामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम, जनजागृती मोहिमा, परिसंवाद, कार्यशाळा, स्पर्धा, रॅली, श्रमदान आणि मोहल्ले, शाळा आणि  सार्वजनिक ठिकाणांवरील व्यापक जनसंपर्क कार्यक्रम यांचा समावेश होता. तसेच पथनाट्ये , समुद्रकिनारे स्वच्छता मोहिमा, मोठ्या प्रमाणावरील लोकसहभाग मोहिमा, 'वेस्ट-टू-वेल्थ' म्हणजेच कचऱ्यातून संपत्ती निर्मिती उपक्रम आणि पर्यावरण संवर्धन उपक्रमही राबवण्यात आले. याव्यतिरिक्त, एकदाच  वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा  वापर कमी करणे, कचरा वर्गीकरण, तसेच फेरवापर  आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन यासंबंधित उपक्रमही हाती घेण्यात आले.

'स्वच्छता पंधरवडा 2026'ची सांगता 'स्वच्छता पंधरावडा पुरस्कार 2026' वितरण समारंभाने झाली. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन कार्यालयांना सचिवांमार्फत स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. 'स्वच्छता पंधरवड्या'तील उत्कृष्ट, अनुकरणीय आणि सक्रिय सहभागाबद्दल अनुक्रमे 'फील्ड ऑपरेशन्स डिव्हिजन' (एफओडी), 'नॅशनल स्टॅटिस्टिकल सिस्टम्स ट्रेनिंग अकादमी' (एनएसएसटीए) आणि 'इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट' (आयएसआय) यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या  सचिवांनी मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाचे आणि समर्पित प्रयत्नांचे कौतुक केले. स्वच्छता ही केवळ पंधरवड्यापुरती मर्यादित न राहता, ती कामाची संस्कृती आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

स्वच्छ, आरोग्यदायी आणि अधिक शाश्वत भारताच्या ध्येयासाठी स्वच्छता संस्थात्मक पातळीवर रुजवणे, पर्यावरणीय जबाबदारीला प्रोत्साहन देणे आणि लोकसहभागाची संस्कृती जोपासणे यांबाबतची आपली कटिबद्धता मंत्रालयाने पुन्हा एकदा अधोरेखित केली.

 

* * *

शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303076) अभ्यागत कक्ष : 21