पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुणा आणि समाधान यांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले

प्रविष्टि तिथि: 24 AUG 2026 8:08AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की करुणेमुळे स्वाभिमान प्राप्त होतो तर समाधानामुळे खरा आनंद मिळतो. या भावनेमुळे समाजातील सहकार्याचे आणि सौहार्द्राचे बंध अधिक दृढ होतात.

पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.

“कारुण्येनात्मनो मानं तृष्णां च परितोषतः।

उत्थानेन जयेत्तन्द्रीं वितर्कं निश्चयाज्जयेत्॥”

इतरांप्रती दयाभाव किंवा सहानुभूती दर्शवल्यास आत्मसन्मान प्राप्त होता, जीवनात आपल्याला जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्याने लोभावर मात करता येते. प्रत्येकाने प्रयत्न आणि उद्यमशीलतेच्या जोरावर आळस, संशयास्पद विचारसरणी आणि निर्णय न घेण्याची वृत्ती यांवर विजय मिळवला पाहिजे, असे या सुभाषितात म्हटले आहे. 

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात लिहिले आहे:

करुणेमुळे आत्मसन्मान मिळतो आणि समाधानामुळे खरे सुख प्राप्त होते. ही भावना समाजातील सहकार्य आणि सलोख्याचे बंध दृढ करते.

कारुण्येनात्मनो मानं तृष्णां च परितोषतः।

उत्थानेन जयेत्तन्द्रीं वितर्कं निश्चयाज्जयेत्॥”

***

नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2302625) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam