दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दूरसंचार आणि माहिती-संचार तंत्रज्ञान (आयसीटी) क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी भारत आणि ब्राझील दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी


पुण्यात पार पडलेल्या 'ब्रिक्स आयसीटी ट्रॅक' बैठकीदरम्यान केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया आणि त्यांच्या ब्राझिलियन समकक्षांकडून सामंजस्य करारावर स्वाक्षरी

प्रविष्टि तिथि: 21 AUG 2026 5:15PM by PIB Mumbai


पुणे येथे पार पडलेल्या 'ब्रिक्स आयसीटी ट्रॅक'  बैठकीदरम्यान भारत आणि ब्राझीलने दूरसंचार आणि माहिती आणि संचार तंत्रज्ञान (आयसीटी) क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
या सामंजस्य करारावर केंद्रीय मंत्री ज्योतिरार्दित्य माधवराव  सिंदिया आणि  ब्राझीलचे दूरसंचार मंत्री  फ्रेडरिको डी सिपेरा फिलो यांनी स्वाक्षरी केली.

या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री ज्योतिरार्दित्य माधवराव  सिंदिया म्हणाले, “मला खात्री आहे की या सामंजस्य करारावरील स्वाक्षरीमुळे भारत-ब्राझील सहकार्य अधिक दृढ होईल. तसेच सार्वत्रिक संपर्क व्यवस्था, सायबर सुरक्षा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता बांधणी आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण या क्षेत्रात मोठ्या सहकार्याचा मार्ग मोकळा होईल.”

व्यापक आयसीटी सहकार्याची रूपरेषा:
हा सामंजस्य करार दूरसंचार आणि आयसीटी क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी एक चौकट प्रस्थापित करतो. समानता, परस्पर लाभ आणि परस्पर आदर या तत्त्वांवर आधारित माहिती, अनुभव आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची नियमित देवाणघेवाण सुलभ करणे तसेच परस्पर फायदेशीर संधी शोधणे हा या कराराचा उद्देश आहे.
या चौकटीत सायबर सुरक्षा, सार्वत्रिक आणि अर्थपूर्ण संपर्क व्यवस्था, डिजिटल समावेशकता, ग्राहक संरक्षण, खाजगी नेटवर्क, डिजिटल संक्रमण आणि आयसीटीचा पर्यावरणावरील प्रभाव कमी करणे यासारख्या प्रमुख क्षेत्रांचाही समावेश आहे.

दूरसंचार आणि आयसीटी क्षेत्रातील भारत-ब्राझील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने हा करार एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे. यामुळे उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, संपर्कव्यवस्था, क्षमता बांधणी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांसाठी सर्वसमावेशक आणि भविष्याभिमुख आराखडा उपलब्ध झाला आहे.

***

सुषमा काणे/आशुतोष सावे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2302141) आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu , Kannada