युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
ब्रिक्स युवा परिषद आणि शिखर परिषद 2026 : दुसऱ्या दिवशी युवा प्रतिनिधींनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला दिली भेट
Posted On:
20 AUG 2026 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2026
भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत 2026 मध्ये आयोजित ब्रिक्स युवा परिषद बैठक आणि ब्रिक्स युवा शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ब्रिक्स देशांतील युवा प्रतिनिधींना गुजरातमधील केवडिया इथे भेट देऊन भारताच्या सांस्कृतिक वारशाचा आणि ऐतिहासिक कामगिरीचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.

या दौऱ्याची सुरुवात गांधीनगरहून केवडियाकडे ब्रिक्स युवा परिषदेचे अधिकारी आणि ब्रिक्स युवा शिखर परिषदेच्या प्रतिनिधींच्या प्रस्थानाने झाली. प्रतिनिधींनी भारतातील प्रमुख राष्ट्रीय स्मारकांपैकी एक असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला भेट दिली. या भेटीद्वारे सहभागी युवा प्रतिनिधींना या स्मारकाचे महत्त्व तसेच त्याच्या परिसरात करण्यात आलेल्या ‘एकता नगर’ विकासकामांची जवळून माहिती घेण्याची संधी मिळाली.
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या या भेटीमुळे प्रतिनिधींना गुजरातच्या समृद्ध सांस्कृतिक विकासाचा अनुभव घेता आला. तसेच भारताची एकता, राष्ट्रीय अखंडता आणि शाश्वत विकासाचं चित्र प्रत्यक्ष अनुभवता आलं.
भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत 19-20 ऑगस्ट 2016 रोजी गांधीनगर इथे ब्रिक्स युवा परिषद बैठक आणि ब्रिक्स युवा शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले. भारताचे ब्रिक्स परिषदेच्या अध्यक्षपदाची संकल्पना, “लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वत विकासासाठी निर्मिती” या संकल्पनेने प्रेरित आहे.
ब्रिक्स युवा परिषद, ब्रिक्स देशांतील तरुणांसाठी सामायिक प्राधान्यक्रमांवर विचारविनिमय करण्याचे आणि युवा वर्गामधील परस्पर सहकार्य अधिक मजबूत करण्याचे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे.
सुषमा काणे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2301784)
अभ्यागत कक्ष : 64