औषधनिर्मिती विभाग
भारतीय औषधनिर्मिती कंपन्यांनी जगातील सर्वोत्तम पाचमध्ये स्थान मिळवावे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
“भारतीय ब्रँड्स देशाची ओळख बनावे आणि जगासाठी आकर्षणाचे केंद्र ठरावे” : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Posted On:
15 AUG 2026 10:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2026
80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औषधनिर्मिती क्षेत्रात झालेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीचा उल्लेख केला आणि जागतिक स्तरावर अधिक मोठी उद्दिष्टे ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, भारताने औषधनिर्मिती क्षेत्रात मोठे काम केले आहे; मात्र आता काही भारतीय औषधनिर्मिती कंपन्यांनी जगातील सर्वोत्तम पाच औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये आपली ठाम ओळख निर्माण करावी, ही काळाची गरज आहे.
पंतप्रधानांनी विविध क्षेत्रांत जागतिक स्तरावर मान्यता मिळवणारे भारतीय ब्रँड तयार करण्याची गरजही अधोरेखित केली. भारतीय सल्लागार आणि लेखापरीक्षण संस्थांनीही जगातील अग्रगण्य संस्थांमध्ये स्थान मिळवण्याचा ध्यास घ्यावा, आणि भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांनी जागतिक नेतृत्व मिळवण्याचे लक्ष्य ठेवावे असे त्यांनी सांगितले. जगाला आकर्षित करणारे ब्रँड तयार करण्याचे आणि भारतीय ब्रँड्सना देशाची भक्कम ओळख तसेच जगासाठी एक आकर्षणाचे केंद्र बनवण्याचे त्यांनी आवाहन केले.


* * *
नितीन फुल्लुके/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2300112)
अभ्यागत कक्ष : 44