श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एका दशकात 25 कोटींपासून 100 कोटींपर्यंत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सामाजिक सुरक्षिततेच्या अभूतपूर्व विस्ताराला केले अधोरेखित 


मागच्या दशकभरात युवांसाठी रोजगार व उद्योजकतेचे नवीन मार्ग झाले खुले: पंतप्रधानांनी दिली माहिती

प्रविष्टि तिथि: 15 AUG 2026 5:53PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य दिन सोहळ्यावेळी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात भारतातील सामाजिक सुरक्षा कवचाच्या अभूतपूर्व विस्तारावर प्रकाश टाकला. त्यांनी म्हटले की 2014 पूर्वी सामाजिक सुरक्षेचा लाभ घेत असलेल्या लोकांची संख्या 25 कोटी होती, ती एका दशकात 100 कोटींवर पोहोचली आहे. 

पंतप्रधानांनी सांगितले की प्रगत भारताची ही संकल्पना तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा विकास तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल. सामाजिक सुरक्षा कवचाच्या विस्ताराला स्पष्ट करताना ते म्हणाले, “2014 पूर्वी फक्त 25 कोटी लोकांना सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळत होता, तर मागील 5-7 दशकांत फक्त 25 कोटी लोकांना तो मिळत होता. मात्र मागच्या दशकभरात आपण 100 कोटी देशवासीयांना सामाजिक सुरक्षा लाभ दिला आहे.” 

सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांमुळे कुटुंबांपर्यंत लाभ पोहोचल्या, यावर भर देत पंतप्रधानांनी आयुष्मान भारत योजनेचा उल्लेख केला, ज्याअंतर्गत 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना ₹5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळत आहेत. 

पंतप्रधानांनी यामध्ये युवकांसाठी रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या मार्गांचा उल्लेख केला. स्टार्टअप इंडिया उपक्रमामुळे 2.5 लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत स्टार्टअप वाढले असून तरुण उद्योजकांनी स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही रोजगार निर्माण केला आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी ₹1 लाख कोटींच्या नवोन्मेष निधी, कौशल्य भारत, डिजिटल इंडिया, अवकाश आणि विमानक्षेत्र क्षेत्रांच्या विकासाचा, तसेच राष्ट्रीय ड्रोन धोरणाचा रोजगार, कौशल्य आणि उद्योजकतेसाठी वाटा यांवर भर दिला. विमानतळांचा विस्तार, नवीन हवाई मार्गांचे सुरू होणे, विमान निर्मिती, देखभाल आणि दुरुस्ती यामुळे कौशल्यधारकांसाठी रोजगार निर्माण होत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसीत भारताच्या संकल्पनेत विकासाचा लाभ तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचणे हे केंद्रस्थानी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

***

माधुरी पांगे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2300038) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी