दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय दूरसंचार मंत्रालयातर्फे येत्या 17 ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान पुण्यात ब्रिक्स आयसीटी ट्रॅक चे आयोजन


ब्रिक्स आयसीटी ट्रॅक ची संकल्पना “ शाश्वत भविष्यासाठी नवोन्मेष, सहकार्य आणि परिवर्तन (आयसीटी)”

आयसीटी ट्रॅक अंतर्गत तीन महत्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन: आयसीटी सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्य गटाच्या सातव्या बैठकीचे आयोजन, डिजिटल ब्रिक्स फोरम आणि एक्सपो आणि दूरसंवाद विभागाच्या मंत्र्यांची 12 वी बैठक

ब्रिक्स आयसीटी बैठकीसाठी पुण्यात ब्रिक्स सदस्य देशांचे प्रतिनिधी येणार एकत्र

या ट्रॅकचे आयोजन, आयसीटी मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करण्यासह, डिजिटल नवोन्मेषाला प्रोत्साहन आणि तंत्रज्ञान-प्रणित, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाठी भारताच्या कटिबद्धतेचे द्योतक

प्रविष्टि तिथि: 15 AUG 2026 2:58PM by PIB Mumbai

 

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपद 2026 चा भाग म्हणून, दूरसंचार विभागाने, पुण्यात 17 ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान, ब्रिक्स आयसीटी ट्रॅक्स (माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान ट्रॅक) चे आयोजन केले असून त्याची संकल्पना, ब्रिक्स आयसीटी ट्रॅक ची संकल्पना “ शाश्वत भविष्यासाठी नवोन्मेष, सहकार्य आणि परिवर्तन (आयसीटी) अशी आहे. ही बैठक BRICS अंतर्गत देशभरात आयोजित करण्यात येत असलेल्या विविध महत्त्वाच्या क्षेत्रांवरील बैठकांच्या मालिकेचा एक भाग असेल.

BRICS या संघटनेत जगातील 11 प्रमुख उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांचा समावेश आहे. हे देश म्हणजे ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती असे आहेत.

या पाच दिवसीय आयसीटी ट्रॅक अंतर्गत, ब्रिक्स सदस्य देशांचे दूरसंचार मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि आयसीटी क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करणे तसेच सुरक्षित, सर्वसमावेशक आणि सक्षम डिजिटल भविष्यासाठी पुढे जाणे हा या ट्रॅकचा उद्देश आहे. या परिषदेदरम्यान, तीन प्रमुख कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत

आयसीटी मधील सहकार्यासाठी ब्रिक्स  कार्यगटाची सातवी बैठक | 17–19 ऑगस्ट 2026

या कार्यक्रमाची सुरुवात 17 ते 19 ऑगस्ट 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 7व्या ब्रिक्स आयसीटी कार्यगटाच्या बैठकीने होणार आहे. या बैठकीत प्रतिनिधी सर्वांसाठी सार्वत्रिक, अर्थपूर्ण, परवडणारी, शाश्वत आणि सक्षम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी आयसीटी संस्थांचा विकास, विश्वासार्ह, सुरक्षित आणि मानवकेंद्रित डिजिटल वातावरण, सर्वसमावेशक विकासासाठी डिजिटल कौशल्ये आणि क्षमता विकास तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, पुढील पिढीतील संप्रेषण तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, मुलांचे ऑनलाइन संरक्षण आणि डिजिटल व्यवस्थेतील सहकार्य यांसह ICT क्षेत्रातील नवोन्मेष, स्टार्टअप्स आणि उद्योजकतेला बळकटी देणे, या प्रमुख प्राधान्य क्षेत्रांवर चर्चा करतील.

डिजिटल ब्रिक्स मंच आणि प्रदर्शन | 20 ऑगस्ट  2026

20 ऑगस्ट 2026 रोजी भारत डिजिटल ब्रिक्स मंच आणि एक्स्पोचे आयोजन केले जाणार आहे. उदयोन्मुख डिजिटल तंत्रज्ञान आणि सक्षम ICT व्यवस्थामधील सहकार्यावर चर्चा करण्यासाठी तसेच या क्षेत्रातील सहकार्याचे प्रदर्शन करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या फोरममध्ये सायबर सुरक्षा आणि विश्वासार्ह आयसीटी, यामध्ये मुलांचे ऑनलाइन संरक्षण, तसेच शाश्वत आणि सक्षम डिजिटल व आयसीटी व्यवस्था या विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत.

ब्रिक्स सदस्य देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची 12 वी बैठक | 21 ऑगस्ट 2026

ब्रिक्स सदस्य देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12 वी बैठक 21 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय  दूरसंचार आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया या बैठकीत भारतातर्फे सहभागी होणार आहेत. ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री ब्रिक्स आयसीटी ट्रॅकच्या प्राधान्यक्रमांवर चर्चा करतील आणि शाश्वत व सक्षम आयसीटी व्यवस्था, सायबर सुरक्षा व विश्वासार्ह आयसीटी, डिजिटल कौशल्य विकास व क्षमता निर्मिती तसेच नवोन्मेष, स्टार्टअप्स आणि उद्योजकता या क्षेत्रांमधील सहकार्य पुढे नेण्यावर विचारविनिमय करतील.

या ट्रॅकअंतर्गत या तिन्ही कार्यक्रमांचे आयोजन, आयसीटी मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करण्यासह, डिजिटल नवोन्मेषाला प्रोत्साहन आणि तंत्रज्ञान-प्रणित, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाठी भारताच्या कटिबद्धतेचे द्योतक आहे.

 

अधिक माहितीसाठी खालील हँडल्स’ना भेट द्या : -

X - https://x.com/DoT_India

Insta-  https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==

Fb - https://www.facebook.com/DoTIndia

Youtube: https://youtube.com/@departmentoftelecom?si=DALnhYkt89U5jAaa

***

माधुरी पांगे/राधिका अघोर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2299962) आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Gujarati , Telugu