सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सूर्योदयाच्या मार्गक्रमणाच्या दिशेनुसार प्रवास करणाऱ्या सूर्यपथ तिरंगा या जागतिक रिले उपक्रमाचा प्रारंभ

प्रविष्टि तिथि: 15 AUG 2026 1:59PM by PIB Mumbai

 

स्वातंत्र्यदिनानिमित्त आज जगभरात भारताच्या सूर्यपथ तिरंगा या जागतिक रिले उपक्रमाचा प्रारंभ झाला. या उपक्रमाअंतर्गत भारताच्या तिरंग्याची जगभरात सूर्योदयाच्या मार्गक्रमणाच्या दिशेनुसार भारतीय ध्वज फडकावला जात आहे.

भारतीय प्रमाण वेळेनुसार आज पहाटे 1:30 ते सकाळी 10:30 या वेळेत, पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरलेल्या विविध देशांमधील 21 भारतीय दूतावास आणि उप दूतावासांनी या जागतिक रिलेचा भाग म्हणून राष्ट्रध्वज फडकवला. या  उपक्रमाअंतर्गत तासांनुसार बदलणाऱ्या वेळेच्या क्षेत्रांमध्ये (Time Zones) उगवत्या सूर्याच्या प्रवासाचा प्रतीकात्मक माग घेतला गेला आहे. या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य, एकता आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना जगभरतल्या विविध खंडांखंडांमध्ये पोहोचवली जात आहे.

सूर्यपथ तिरंगा उपक्रमाअंतर्गत, निवडक भारतीय दूतावास आणि उप दूतावासांमध्ये टप्प्याटप्प्याने आणि समन्वयाने ध्वजारोहण केले जात आहे. जगाच्या एका भागात पहाट होताच तिथे राष्ट्रध्वज फडकवला जातो, त्यानंतर त्याच्या पश्चिमेकडच्या दिशेच्या पुढच्या दूतावास किंवा उप दूतावासात ध्वजारोहण केले जात आहे. यामुळे जगभरात तिरंग्याची एक सलग स्वरुपाची साखळी निर्माण होत आहे.

हर घर तिरंगा 2026 अभियानाचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे. देशाचा तिरंगा ध्वज भौगोलिक सीमांच्या पलीकडे जात, जगभरातील भारतीय नागरिकांना आणि भारताच्या मित्र देशांना एकत्र आणण्याचे काम करतो. याच संदेशाला या उपक्रमाच्या माध्यमातून बळ दिले जात आहे.

ही जागतिक रिले भारताची एकता, देशभक्ती आणि जागतिक अस्तित्वाचा उत्सव आहे. आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त उगवत्या सूर्याच्या मार्गाक्रमणाच्या दिशेने तिरंगा फडकावणारे भारतीय दूतावास आणि उप दूतावास हे याच राष्ट्रीय भावनेचे दूत ठरले आहेत. 

पूर्वेकडील दिवसाच्या पहिल्या किरणाने प्रारंभ होत असलेल्या सूर्यपथ तिरंगा हा उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील वेळेच्या प्रवासाला राष्ट्रध्वजाच्या एका प्रतीकात्मक प्रवासात रूपांतरण घडवून आणले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विकसित भारत, राष्ट्रीय अभिमान तसेच एकतेची भावना पश्चिमेच्या जगतापर्यंत पोहचवली जात आहे.

*** 

नितीन फुल्लुके/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2299948) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Gujarati , Telugu