पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी राजघाट येथे महात्मा गांधींना अर्पण केली आदरांजली

Posted On: 15 AUG 2026 10:12AM by PIB Mumbai

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजघाट येथे महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. राष्ट्र त्यांच्या विचारातून आणि कार्यातून नेहमीच प्रेरणा घेत राहील, असे पंतप्रधानांनी नमूद केले. प्रत्येक भारतीयाच्या प्रगतीसाठी कार्य करत राहण्याची तसेच देशाला प्रगत आणि समृद्ध करण्याची आपली बांधिलकी पंतप्रधानांनी यावेळी पुन्हा अधोरेखित केली.

‘एक्स’वरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,

आज सकाळी राजघाट येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यांच्या विचार आणि कार्यातून आपण नेहमीच प्रेरणा घेत राहू. प्रत्येक भारतीयाच्या प्रगतीसाठी तसेच आपल्या देशाला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी आपण कार्यरत राहू.

***

नितीन फुल्लुके/राज दळेकर/परशुराम कोर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2299761) अभ्यागत कक्ष : 48