निती आयोग
उत्पादन व्यवस्थेचा आणखी विकास करण्यासाठी प्रभावी हस्तक्षेप करत, विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल
प्रविष्टि तिथि:
13 AUG 2026 8:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2026
“भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठीची महत्वाची क्षेत्रे”, अशा शीर्षकाचा अहवाल नीती आयोगाने प्रसिद्ध केला आहे. या अहवालात, भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करू शकतील अशा निवडक आणि महत्वाच्या क्षेत्रांविषयी, एक सूत्रबद्ध आणि डेटा-प्रणित आराखडा देण्यात आला आहे. विशेषतः ह्या अहवालात, रसायने, टेलिकॉम आणि नेटवर्किंग साधने, वस्त्रोद्योग आणि सौर फोटो व्होल्टनिक उत्पादन केंद्र, अशा चार क्षेत्रांविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे.
या मूल्यांकनात, भारताच्या उत्पादनविषयक परिदृश्याचा, जागतिक ट्रेंडसशी असलेला संबंध, विविध क्षेत्रात असलेल्या वृद्धीच्या संधी आणि जागतिक मानांकन, यावर भर देण्यात आला आहे. उत्पादन क्षेत्राच्या स्पर्धात्मकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांचाही यात अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये बाजारपेठेची क्षमता, पायाभूत सुविधांची सज्जता, धोरणात्मक पाठबळ, कच्च्या मालाची उपलब्धता, तंत्रज्ञानाची सज्जता, रोजगारनिर्मितीची क्षमता आणि मूल्यसाखळीत भारताचे सध्याचे स्थान यांचाही समावेश आहे.
भारताला ज्या क्षेत्रात विकासाच्या लक्षणीय संधी आहेत, अशी क्षेत्रे ओळखून, त्यात आवश्यक तिथे हस्तक्षेप करून, देशांतर्गत क्षमता वाढवण्यासाठी, स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आणि मूल्यवर्धनासाठी प्रयत्न केले जावेत, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. त्याशिवाय, निर्यात क्षम उत्पादन वृद्धीला चालना देण्यासही सुचवण्यात आले आहे.
या अध्ययनात, उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या देशांच्या अनुभवांचा अभ्यास करून, त्यांच्यानुसार, क्षेत्र-विशिष्ट शिफारसी करण्यात आल्या आहे. या क्षेत्रासमोर असलेली महत्वाची आव्हाने समजून घेत त्यांच्या वाढीसाठी चालना देण्याच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत.
या अहवालात, रसायने, टेलिकॉम आणि नेटवर्किंग साधने, वस्त्रोद्योग आणि सौर फोटो व्होल्टनिक उत्पादन केंद्र, अशा, विकासाच्या संधी असलेल्या चार महत्वाच्या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे.
हा अहवाल बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करावे:
https://www.niti.gov.in/sites/default/files/2026-08/Key-Sectors-to-Position-India-as-a-Global-Manufacturing-Hub.pdf
सुवर्णा बेडेकर / राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2299195)
आगंतुक पटल : 14