सांस्कृतिक मंत्रालय
चोरी झालेल्या प्राचीन कलाकृती परत मिळवणे
प्रविष्टि तिथि:
13 AUG 2026 3:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2026
परत मिळवलेल्या प्राचीन कलाकृतींची देश -निहाय यादी 'परिशिष्ट I' मध्ये दिली आहे.
वसाहतवादी काळात परदेशात नेण्यात आलेल्या वस्तू/ कलाकृती परत मिळवण्याचा मुद्दा सरकार विविध व्यासपीठांवर मांडत असते. लागू असलेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायदे व करार लक्षात घेऊन, प्रत्येक प्रकरणानुसार या वस्तू परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. संबंधित देश किंवा सरकारांमधील परस्पर सामंजस्य आणि सहकार्याद्वारे अशा वस्तू परत मिळवण्याची प्रक्रिया सुलभ केली जाते.
जगभरातील अनेक संग्रहालये आणि कलादालनांमध्ये भारतीय प्राचीन कलाकृती जतन केलेल्या आहेत; याव्यतिरिक्त, खाजगी व्यक्तींकडेही अशा कलाकृतींचा संग्रह आहे. मात्र, अशा संग्रहांची कोणतीही सर्वसमावेशक यादी उपलब्ध नाही. जेव्हा परदेशात भारतीय बनावटीची एखादी प्राचीन कलाकृती बेकायदेशीरपणे नेल्याचे निदर्शनास येते, तेव्हा ती परत मिळवण्यासाठी संबंधित भारतीय दूतावास किंवा मिशनमार्फत आवश्यक ती कार्यवाही सुरू केली जाते.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि नेदरलँड्समधून परत मिळवलेल्या प्राचीन कलाकृतींचा तपशील
|
Sl. No.
|
Country
|
Number of Antiquities (Till June 2026)
|
-
|
Australia
|
51
|
-
|
Netherlands
|
01
|
-
|
UK
|
21
|
-
|
USA
|
589
|
|
|
|
662
|
केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
सोनाली काकडे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2298874)
आगंतुक पटल : 16