अंतराळ विभाग
अंतराळ क्षेत्रातील खाजगी कंपन्या
प्रविष्टि तिथि:
13 AUG 2026 3:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2026
डीपीआयआयटी स्टार्टअप इंडिया पोर्टलनुसार, देशात सुमारे 440 अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप्सची नोंदणी झाली आहे. इन-स्पेसने (IN-SPACe) 52 बिगर-सरकारी संस्थांना (एन जी ई) विविध अंतराळ उपक्रम राबवण्यासाठी 113 परवानग्या दिल्या आहेत, त्यापैकी 18 स्टार्टअप्स आहेत. त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
अग्निकुल कॉसमॉस प्रा. लि.,
अक्षत एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड,
अझिस्टा बीएसटी,
बेलॅट्रिक्स एरोस्पेस प्रा. लि.,
कॉस्मोसर्व स्पेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,
ध्रुव स्पेस प्रायव्हेट लिमिटेड,
दिगंतरा रिसर्च अँड टेक्नॉलॉजीज प्रा. लि.
गॅलॅक्सआय स्पेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड,
हेक्स20लॅब्स इंडिया प्रा. लि.,
इनॉर्बिट स्पेस टेलिकम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड,
मनस्तु स्पेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड,
एनस्पेस टेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,
ऑर्बिटएड एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड,
पिअरसाइट स्पेस प्रायव्हेट लिमिटेड,
पिक्सलस्पेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,
स्कायरूट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड,
स्पेस किड्झ इंडिया,
टेकमी2स्पेस टेक्नॉलॉजीज प्रा. लि.
इस्रोच्या पायाभूत सुविधांच्या (ज्यात इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण तळांचा समावेश आहे) वापरासाठी आणि प्रवेशासाठी इन-स्पेसच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्राप्त झालेल्या अर्जांवर प्रमाणित एसओपीनुसार प्रक्रिया केली जाते आणि सज्जतेच्या पैलूंचे पुनरावलोकन इन-स्पेसच्या तज्ज्ञ समितीद्वारे केले जाते.
पुढील दोन वर्षांत भारतीय खाजगी कंपन्यांद्वारे प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या व्यावसायिक रॉकेटची एकूण संख्या खालीलप्रमाणे आहे:
आर्थिक वर्ष 26-27: 02
आर्थिक वर्ष 27-28: प्रक्षेपणांच्या वेळापत्रकाला इन-स्पेसकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. भारतीय खाजगी कंपन्यांकडून 6 पेक्षा जास्त प्रक्षेपणे होण्याची शक्यता आहे.
ही माहिती पंतप्रधान कार्यालय आणि कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अवकाश विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
सोनाली काकडे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2298867)
आगंतुक पटल : 19