नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानामुळे पेट्रोलियम आणि रिफायनिंग क्षेत्रात हरित हायड्रोजनचा अवलंब करण्याला गती
Posted On:
11 AUG 2026 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2026
केंद्र सरकार राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान राबवत असून भारताला हरित हायड्रोजन आणि त्यापासून मिळणाऱ्या उत्पादनांच्या निर्मिती, उपयोग आणि निर्यातीत जागतिक केंद्र बनवणे, हा या अभियानामागचा हेतू आहे.
या अभियानाअंतर्गत असलेल्या साइट (SIGHT -Strategic Interventions for Green Hydrogen Transition) अर्थात हरित हायड्रोजन संक्रमणासाठी धोरणात्मक हस्तक्षेप -2 बी योजनेअंतर्गत पुढील तपशीलांनुसार रिफायनरींसाठी 30 किलो-टन प्रति वर्ष (केटीपीए) इतकी हरित हायड्रोजन उत्पादन क्षमता मंजूर करण्यात आली आहे.
|
Refinery
|
Location
|
Green Hydrogen Production Capacity
|
|
Indian Oil Corporation Limited
|
Panipat
|
10 KTPA
|
|
Bharat Petroleum Corporation Limited
|
Bina
|
5 KTPA
|
|
Hindustan Petroleum Corporation Limited
|
Vizag
|
5 KTPA
|
|
Numaligarh Refineries Limited
|
Numaligarh
|
10 KTPA
|
|
Total
|
|
30 KTPA
|
हे प्रकल्प खाजगी विकासकांद्वारे 'बीओओ' (बांधणे, मालकी आणि संचालन) या पद्धतीनुसार राबवले जातात आणि यात संबंधित प्रकल्प विकासकांकडून प्रकल्पनिर्दिष्ट गुंतवणूक केली जाते. हरित हायड्रोजनचे देशांतर्गत उत्पादन आणि वापर यामुळे आयातित जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होईल, ऊर्जा सुरक्षा बळकट होईल आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमण तसेच 'नेट-झिरो' (निव्वळ शून्य उत्सर्जन) उद्दिष्टांना चालना मिळेल.
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्यसभेतील एका प्रश्नाला लेखी उत्तरात ही माहिती दिली.
निलीमा चितळे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2297698)
अभ्यागत कक्ष : 54