मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार - 2026 साठी मागविली नामांकने

प्रविष्टि तिथि: 07 AUG 2026 10:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2026

मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयांतर्गत असलेला पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका प्रदान करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या प्रभावी विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भारतातील देशी गोवंशीय जाती सशक्त असून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची अनुवांशिक क्षमता आहे. देशी गोवंशीय जातींचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन आणि विकास करण्याच्या उद्देशाने डिसेंबर 2014 मध्ये “राष्ट्रीय गोकुळ मिशन (आरजीएम)” सुरू करण्यात आले.

आरजीएम अंतर्गत 2021 पासून हा विभाग दुग्ध उत्पादक शेतकरी, दुग्ध सहकारी संस्था/एमपीसी/एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी) यांच्या प्रयत्नांना मान्यता आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारांचे (एनजीआरए) वितरण करत आहे. यावर्षी देखील राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 साठी खालील श्रेणींकरिता नामांकने मागविण्यात येत आहेत:

देशी गायी/म्हशींच्या जातींचे पालन करणारे सर्वोत्कृष्ट दुग्ध उत्पादक शेतकरी (तपशील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेला आहे)

सर्वोत्कृष्ट दुग्ध सहकारी संस्था (डीसीएस)/ दूध उत्पादक कंपनी (एमपीसी)/ दुग्ध उत्पादक शेतकरी संघटना (एफपीओ)

सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी)

ईशान्य प्रदेश आणि हिमालयीन राज्यांमध्ये दुग्ध विकासाच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि चालना देण्यासाठी विशेष पुरस्काराची तरतूद आहे.

वर नमूद केलेल्या प्रत्येक श्रेणीमध्ये NGRA 2026 अंतर्गत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्यांना, तसेच ईशान्येकडील प्रदेश किंवा हिमालयीन राज्यांमधील एका विजेत्याला 'विशेष पुरस्कार' प्रदान केला जाईल. NGRA 2026 मध्ये गुणवत्ता प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रकमेचे पारितोषिक यांचा समावेश असेल; हे पुरस्कार 'सर्वोत्कृष्ट दुग्ध उत्पादक शेतकरी' आणि 'सर्वोत्कृष्ट डीसीएस/एफपीओ/एमपीसी' या दोन श्रेणींसाठी खालीलप्रमाणे दिले जातील:
 
प्रथम क्रमांकासाठी रु. 5,00,000/- (फक्त पाच लाख रुपये)

द्वितीय क्रमांकासाठी रु. 3,00,000/- (फक्त तीन लाख रुपये) आणि

तृतीय क्रमांकासाठी रु. 2,00,000/- (फक्त दोन लाख रुपये)

रु. 2,00,000/- (फक्त दोन लाख रुपये) - ईशान्य प्रदेश (NER) / हिमालयीन राज्यांसाठी विशेष पुरस्कार.

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2026 मध्ये सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी) श्रेणीच्या बाबतीत केवळ गुणवत्ता प्रमाणपत्र आणि एक स्मृतिचिन्ह यांचा समावेश असेल. 

कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी) श्रेणीमध्ये कोणतेही रोख पारितोषिक दिले जाणार नाही.
 
2026 सालच्या राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठीची नामांकने केवळ ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in वर 10.08.2026 पासून सादर करता येतील. नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 10.09.2026 आहे. हे पुरस्कार राष्ट्रीय दुग्ध दिनाचे (26 नोव्हेंबर, 2026) औचित्य साधून प्रदान केले जातील. पात्रता निकष आणि मार्गदर्शक तत्त्वांविषयी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in किंवा https://dahd.nic.in या संकेतस्थळांना भेट देता येईल.

माधुरी पांगे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2296425) आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी