शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय साधन-सह-गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करू शकतात

प्रविष्टि तिथि: 06 AUG 2026 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2026

राष्ट्रीय साधन-सह-गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी (नॅशनल मेन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप स्कीम) शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी पात्र विद्यार्थ्यांनी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. हे अर्ज राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (NSP) सादर करायचे आहेत.

NMMSS अंतर्गत अर्जांची पडताळणी दोन टप्प्यांत केली जाते:

स्तर-1 (L1) पडताळणी: संस्था नोडल अधिकाऱ्याद्वारे (INO) – अंतिम तारीख: 15 सप्टेंबर 2026.
स्तर-2 (L2) पडताळणी: जिल्हा नोडल अधिकाऱ्याद्वारे (DNO) – अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2026.

तसेच, 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून, विद्यार्थी संबंधित योजनांनुसार निश्चित केलेल्या पात्रता अटींची पूर्तता करण्याच्या अधीन राहून, एका गुणवत्ता-आधारित शिष्यवृत्ती योजनेसाठी आणि एक किंवा अधिक कल्याणकारी शिष्यवृत्ती योजनांसाठी एकाच वेळी अर्ज करू शकतात.

इयत्ता आठवीनंतर शिक्षण सुरू ठेवण्यास प्रोत्साहन देऊन माध्यमिक स्तरावरील शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्याच्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या उद्देशाने ही केंद्र सरकारची योजना सुरू करण्यात आली होती.

या योजनेअंतर्गत, राज्य शासन, शासकीय अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता नववीतील पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी एक लाख नवीन शिष्यवृत्त्या दिल्या जातात. तसेच विहित अटींच्या अधीन राहून इयत्ता 10 वी ते 12 वी पर्यंत या शिष्यवृत्तीचे नूतनीकरण केले जाते.

अंतिम क्षणी होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम तारखेच्या आधीच आपले अर्ज सादर करावेत, अशी सूचना, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने दिला आहे. त्याचप्रमाणे, शिष्यवृत्तीची प्रक्रिया आणि वितरण वेळेत होण्यास मदत व्हावी यासाठी संस्था आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांनी विहित वेळेतच पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राधिका अघोर/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2295817) आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Gujarati