अर्थ मंत्रालय
भारत सरकारच्या खात्यांचा जून 2026 (आर्थिक वर्ष 2026-27) पर्यंतचा मासिक आढावा
प्रविष्टि तिथि:
05 AUG 2026 8:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2026
भारत सरकारच्या जून 2026 पर्यंतच्या मासिक खात्यांची माहिती संकलित करून, त्याचा एकत्रित अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :-
भारत सरकारला जून 2026च्या अखेरपर्यंत 10,49,243 कोटी रुपये इतली प्राप्ती झाली असून, ही रक्कम 2026-27 च्या एकूण प्राप्तीच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 28.7 टक्के आहे. यामध्ये केंद्राचा निव्वळ कर महसूल 6,36,576 कोटी रुपये, करेतर महसूल 3,77,664 कोटी रुपये आणि कर्जेतर भांडवली प्राप्ती 2,63,336 कोटी रुपये इतकी आहे. या कालावधीत भारत सरकारने राज्य सरकारांना करांमधील त्यांच्या वाट्यापोटी 2,63,336 कोटी रुपये हस्तांतरित केले असून, ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत 63,605 कोटींनी कमी आहे.

भारत सरकारचा जून 2026 अखेरपर्यंतचा एकूण खर्च 13,57,076 कोटी रुपये इतका झाला असून, हा 2026-27 च्या संबंधित अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 25.4 टक्के आहे. यापैकी 10,16,818 कोटी रुपये महसुली खात्यावर तर 3,40,258 कोटी रुपये भांडवली आहे.
एकूण महसुली खर्चापैकी 3,46,414 कोटी व्याज देयकांवर तर 1,14,812 कोटी रुपये प्रमुख अनुदानांवर खर्च करण्यात आले आहेत.
माधुरी पांगे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2295205)
आगंतुक पटल : 10