पंतप्रधान कार्यालय
भारतीय खेळाडूंच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कामगिरीविषयी पंतप्रधानांकडून अभिमानाची भावना व्यक्त
Posted On:
03 AUG 2026 9:55AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लास्गो इथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय क्रीडापटूंच्या कामगिरीविषयी अभिमान व्यक्त केला आहे.
भारताने या स्पर्धेत 13 सुवर्ण पदकांसह एकूण 39 पदके मिळवल्याबद्दल आनंद व्यक्त करत, पंतप्रधानांनी पदक विजेत्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे अद्वितीय कौशल्य, निर्धार आणि समर्पित भावना दिसून आली असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या खेळाडूंची मेहनत देशातील युवा पिढीला प्रेरणा देत राहील, असेही पंतप्रधान म्हणाले.
मोदी यांनी भविष्यातील स्पर्धांसाठी संपूर्ण भारतीय चमूला शुभेच्छा दिल्या आणि ते देशासाठी अशीच गौरवास्पद कामगिरी यापुढेही करत राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
‘एक्स’ माध्यमावर मोदी लिहीतात,
“आपल्या खेळाडूंच्या ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कामगिरीचा अभिमान वाटतो!
भारताने 13 सुवर्णपदकांसह 39 पदके जिंकल्याचा आनंद आहे. सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
या स्पर्धेत आपल्या कुशल क्रीडापटूंनी असामान्य कौशल्य, निर्धार आणि समर्पित वृत्तीचे दर्शन घडवले. त्यांची मेहनत आपल्या युवा पिढीला प्रेरणा देत राहील.
भविष्यातील स्पर्धांसाठी संपूर्ण भारतीय चमूला माझ्या हार्दिक शुभेच्छा. अशीच उत्कृष्ट कामगिरी ते यापुढेही करत राहोत आणि देशाचा गौरव अजून उंचावत राहोत.”
***
NehaKulkarni / SurekhaJoshi / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2293650)
अभ्यागत कक्ष : 60
Read this releasein:
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil