पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पुरुषांच्या एफ-57 गोळाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल शुभम जुयाल यांचे पंतप्रधान यांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 02 AUG 2026 12:50AM by PIB Mumbai

 

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या एफ57 गोळाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल शुभम जुयाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी शुभम जुयाल यांच्या प्रभावी तंत्राचे आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाचे कौतुक केले. 

त्यांनी हा यशस्वी टप्पा शुभम यांना भविष्यात आणखी मोठी कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

समाजमाध्यम 'एक्स' वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, "राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या एफ57 गोळाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकून भारताची मान उंचावणाऱ्या शुभम जुयाल यांचा आपल्याला अत्यंत अभिमान आहे. त्यांचे प्रभावी तंत्र आणि खेळाप्रती असलेली निष्ठा कौतुकास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे भविष्यात आणखी मोठ्या कामगिरीसाठी त्यांना प्रेरणा मिळो. त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा."

#CWG2026”

***

यश राणे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2293411) आगंतुक पटल : 4
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam