पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 54 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रीती यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
02 AUG 2026 12:43AM by PIB Mumbai
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 54 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रीती यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी म्हटले आहे की, प्रीती यांनी सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करत हे सुवर्णपदक पटकावले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करत पंतप्रधानांनी आगामी काळातही त्यांना अशीच यशस्वी कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
समाजमाध्यम 'एक्स' वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले,
"महिलांच्या 54 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून प्रीती यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. आगामी काळातही त्यांना अशीच यशस्वी वाटचाल करता यावी, हीच शुभेच्छा."
#CWG2026”
***
यश राणे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2293401)
अभ्यागत कक्ष : 34
Read this releasein:
Kannada
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam