पंतप्रधान कार्यालय
पुरुषांच्या एफ57 गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सोमन राणा यांचे पंतप्रधान यांनी केले अभिनंदन
Posted On:
02 AUG 2026 12:53AM by PIB Mumbai
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या एफ-57 गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सोमन राणा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.
पंतप्रधानांनी म्हटले आहे की, या उल्लेखनीय विजयासह सोमन राणा यांनी या स्पर्धेत भारताला पहिलेवहिले राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे.
स्पर्धेदरम्यान त्यांनी दाखविलेल्या एकाग्रतेचे आणि अढळ निर्धाराचे पंतप्रधानांनी कौतुक केले. तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
समाजमाध्यम 'एक्स' वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले,
"सोमन राणा यांनी इतिहास रचला आहे.
पुरुषांच्या एफ57 गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या उल्लेखनीय विजयासह त्यांनी या प्रकारात भारताला पहिलेवहिले राष्ट्रमंडल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवून दिले आहे. संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्यांची एकाग्रता आणि अढळ निर्धार स्पष्टपणे दिसून आला. त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
#CWG2026”
***
यश राणे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2293380)
अभ्यागत कक्ष : 35
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam