पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी यश वीर सिंह यांचे अभिनंदन केले.
Posted On:
01 AUG 2026 8:49AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या भालाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल यश वीर सिंह यांचे अभिनंदन केले आहे.
यश वीर सिंह यांची प्रभावी फेक त्यांचा उत्साह आणि समर्पणाचे दर्शन घडवणारी होती, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
त्यांच्या या कामगिरीमुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी 'एक्स' (X) वर लिहिले आहे:
“पुरुष गटातील भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल यश वीर सिंह याचे अभिनंदन! त्याने केलेली भालाफेक अत्यंत प्रभावी होती आणि त्यामधून त्याचा उत्साह आणि समर्पण दिसून आले. त्याच्या या कामगिरीमुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
#CWG2026”
पुरुष गटातील भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल यश वीर सिंह याचे अभिनंदन! त्याने केलेली भालाफेक अत्यंत प्रभावी होती आणि त्यामधून त्याचा उत्साह आणि समर्पण दिसून आले. त्याच्या या कामगिरीमुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. #CWG2026 pic.twitter.com/nMq59WERgs
— नरेंद्र मोदी (@narendramodi) August 1, 2026
***
यश राणे/राजश्री आगाशे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2292866)
अभ्यागत कक्ष : 44
Read this releasein:
Telugu
,
Kannada
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Malayalam