सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या कांदा मूल्य साखळीचे बळकटीकरण: व्हीसीएफ-एससी च्या पाठबळाने 'खेमानंद दुध आणि कृषी उत्पादक कंपनी लिमिटेडने हजारो शेतकऱ्यांना सक्षम बनवले  

प्रविष्टि तिथि: 31 JUL 2026 5:44PM by PIB Mumbai

 
प्रशांत सदाशिव लोखंडे, प्रवर्तक

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि काढणीपश्चात होणारे नुकसान कमी करण्यासाठी, काढणी नंतरच्या आधुनिक पायाभूत सुविधा आणि बाजारपेठेतील कार्यक्षम दुवे उपलब्ध असणे आवश्यक ठरले आहे. असेच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे अहिल्यानगर येथील 'खेमानंद दूध  आणि कृषी उत्पादक कंपनी लिमिटेड, या कंपनीने एकात्मिक काढणी नंतरची प्रक्रिया आणि खरेदी नेटवर्कद्वारे कांद्याच्या मूल्य साखळीत आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. या कंपनीचा प्रवास सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत असलेल्या 'अनुसूचित जातींसाठीच्या व्हेंचर कॅपिटल फंड'चा (व्हीसीएफ-एससी) परिवर्तनकारी प्रभाव दर्शवतो.
कंपनीने महाराष्ट्रात पाच ठिकाणी पीएमकेएसवाय-ऑपरेशन ग्रीन्स योजनेंतर्गत कांद्यासाठी एकात्मिक मूल्य साखळी विकास प्रकल्प स्थापन केला. या प्रकल्पात खरेदी, प्रतवारी, वर्गीकरण, पॅकेजिंग, शीतगृह आणि निर्जलीकरण प्रकल्पाचा समावेश आहे, तसेच याला भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे सहकार्यही लाभले आहे. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या या प्रकल्पाच्या क्षमतेची दखल घेऊन, 'अनुसूचित जातींसाठीच्या व्हेंचर कॅपिटल फंड'ने 2023 मध्ये इक्विटी आणि पर्यायी परिवर्तनीय डिबेंचर्सचा समावेश असलेल्या व्हेंचर कॅपिटल सहाय्याद्वारे या प्रकल्पाला 12 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले. या मदतीमुळे कंपनीला काढणीपश्चात प्रक्रिया पायाभूत सुविधा बळकट करणे, खरेदी क्षमता वाढवणे आणि शेतकऱ्यांना संघटित बाजारपेठांशी जोडणारी कार्यक्षम पुरवठा साखळी उभारणे शक्य झाले.

काढणीपश्चात प्रक्रिया आणि कृषी सुविधा
या उपक्रमाचा प्रभाव लक्षणीय राहिला आहे. आज या उपक्रमाने आपले शेतकरी जाळे जवळजवळ 8,000 शेतकऱ्यांपर्यंत विस्तारले आहे, तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती, तसेच ग्रामीण भागात उत्पादक मालमत्तेची निर्मिती केली आहे, त्याच बरोबर वार्षिक 25.51 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे आणि आपली निव्वळ संपत्ती ₹30 कोटींपर्यंत वाढवून मजबूत केली आहे. या प्रकल्पामुळे प्रतवारी, हाताळणी आणि साठवणुकीच्या सुविधांमध्ये सुधारणा झाली, काढणीनंतरचे नुकसान कमी झाले, शेतकऱ्यांना मिळणारा भाव वाढला, आणि संस्थात्मक खरेदीदार आणि संघटित किरकोळ कंपन्यांशी मजबूत बाजारपेठ संबंध प्रस्थापित झाले, यामुळे शाश्वत ग्रामीण उपजीविका निर्माण झाली.
या प्रवासाबद्दल सांगताना प्रशांत सदाशिव लोखंडे म्हणाले:
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या 'अनुसूचित जातींसाठीच्या व्हेंचर कॅपिटल फंड' (व्हीसीएफ-एससी) द्वारे मिळालेल्या पाठिंब्यामुळे, बाजारापर्यंत उत्तम पोहोच आणि मूल्यवर्धनाद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या आमच्या मोहिमेला बळकटी मिळाली. आज, 'खेमानंद दूध आणि कृषी उत्पादक कंपनी' शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला मोबदला मिळवून देण्यात, नासाडी कमी करण्यात आणि शाश्वत ग्रामीण उपजीविका निर्माण करण्यात सहाय्य करत आहे, तसेच समावेशक कृषी विकासातही योगदान देत आहे.”

काढणीपश्चात प्रक्रिया आणि कृषीमाल खरेदी सुविधा

'अनुसूचित जातींसाठीच्या व्हेंचर कॅपिटल फंड' (व्हीसीएफ-एससी) अंतर्गत मिळणारे लक्ष्यित आर्थिक सहाय्य उद्योगांना आधुनिक कृषी पायाभूत सुविधा उभारायला, रोजगार निर्मितीला, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायला आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करायला कशा प्रकारे सक्षम करत आहे, हे ‘खेमानंद दुध आणि कृषी उत्पादक कंपनी लिमिटेडच्या यशावरून दिसून येते. उद्योजकता आणि समावेशक मूल्य-साखळी विकासाला चालना देऊन, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय देशभरात शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करत आहे आणि समन्यायी आर्थिक विकासाला चालना देत आहे.

***

सुषमा काणे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2292759) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati