पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आषाढी एकादशीच्या शुभप्रसंगी सर्वांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
25 JUL 2026 11:35AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आषाढी एकादशीच्या शुभ प्रसंगी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा पवित्र दिवस भक्ती आणि करुणेचा शाश्वत संदेश देणारा आहे, असे त्यांनी नमूद केले.
भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद सर्वांच्या जीवनात आनंद, सुसंवाद आणि समृद्धी घेऊन येवो आणि एका चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी सर्वांना मार्गदर्शन करो, अशी प्रार्थना मोदी यांनी केली आहे. भगवान विठ्ठलांनी प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी, सन्मानासाठी आणि उन्नतीसाठी निःस्वार्थ भावनेने सेवा करण्याचा तसेच त्यासाठी अविरत परिश्रम करण्याचा आपल्या सर्वांचा निर्धार अधिक बळकट करावा, अशी सदिच्छा देखील पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
एक्स (X) समाज माध्यमावरील वरील आपल्या संदेशांच्या मालिकेत पंतप्रधानांनी लिहिले आहे:
"आषाढी एकादशीच्या शुभ प्रसंगी मनःपूर्वक शुभेच्छा. हा पवित्र दिवस भक्ती आणि करुणेचा शाश्वत संदेश देतो. भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, सुसंवाद आणि समृद्धी आणो आणि एका चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला मार्गदर्शन करो. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी सेवा करण्याचा आणि अथक परिश्रम करण्याचा आपल्या सर्वांचा संकल्प भगवंताने अधिक दृढ करावा."
" आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त हार्दिक शुभेच्छा. हा मंगलमय दिवस भक्ती, करुणा आणि सामाजिक सलोख्याचा चिरंतन संदेश देणारा आहे. भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, सलोखा आणि समृद्धी घेऊन येवो, हीच कामना. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अविरत कार्य करण्याचा आपला संकल्प अधिक दृढ होवो, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना."
***
अंबादास यादव/आशुतोष सावे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2289292)
आगंतुक पटल : 14