नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
भारताच्या अक्षय्य ऊर्जेची स्थापित क्षमता 2014 पासून जवळपास चौपट होऊन 288.58 गिगावॅटवर पोहोचली
Posted On:
21 JUL 2026 8:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,21 जुलै 2026
देशातील अक्षय्य ऊर्जेची स्थापित क्षमता 2014 मधील 76.38 गिगावॅटवरून वाढून 30.06.2026 अखेर 288.58 गिगावॅट झाली आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि इतर अक्षय्य ऊर्जा स्रोतांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
|
स्रोत
|
स्थापित क्षमता (गिगावॅट)
|
|
सौर ऊर्जा
|
162.15
|
|
पवन ऊर्जा
|
57.44
|
|
जैव ऊर्जा
|
11.75
|
|
जलविद्युत
|
57.24
|
|
एकूण
|
288.58
|
30.06.2026 पर्यंत देशात बिगर-जीवाश्म इंधन स्रोतांवर आधारित एकूण 297.36 गिगावॅट वीज क्षमता स्थापित झाली आहे. यामध्ये 288.58 गिगावॅट अक्षय्य ऊर्जा क्षमता आणि 8.78 गिगावॅट अणुऊर्जा क्षमतेचा समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2014 ते आर्थिक वर्ष 2026 या कालावधीत, देशातील अक्षय्य ऊर्जा क्षेत्राने सुमारे 45.72 अब्ज अमेरिकी डॉलरची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित केली आहे. याशिवाय, या काळात देशांतर्गत वित्तीय संस्थांनी (12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका, आयआरइडीए, पीएफसी, आरईसी, आयआयएफसीएल, नॅबफिड आणि सिडबी) अक्षय्य ऊर्जा क्षेत्रासाठी 12.32 लाख कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.
ही माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येस्सो नाईक यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.
माधुरी पांगे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2287425)
अभ्यागत कक्ष : 45