वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
निर्यात बाजारपेठांमधील वैविध्यासाठी सरकारकडून एफटीए आणि निर्यात प्रोत्साहन उपाययोजनांचा विस्तार
प्रविष्टि तिथि:
21 JUL 2026 3:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,21 जुलै 2026
बदलत्या जागतिक भूराजकीय आणि आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निर्यात बाजारपेठांमध्ये विविधता आणण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये मुक्त व्यापार करार (एफटीए) आणि सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी/सहकार्य करार (सीईपीए/सीईसीए) यांचे जाळे विस्तारणे, निर्यातदारांना बाजारपेठेत प्राधान्यपूर्ण प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रमुख अर्थव्यवस्था आणि प्रदेशांशी व्यापारविषयक वाटाघाटी करणे, निर्यात प्रोत्साहन अभियान, परदेशातील भारतीय दूतावास, निर्यात प्रोत्साहन परिषदा, उद्योग संघटना आणि इतर संबंधित घटकांच्या माध्यमातून केंद्रित निर्यात-प्रोत्साहन उपक्रम राबवणे, जिल्हे निर्यात केंद्र या उपक्रमांतर्गत जिल्हा आणि क्षेत्र-विशिष्ट निर्यात-प्रोत्साहन उपाययोजनांची अंमलबजावणी करणे; तसेच क्षमता-बांधणी कार्यक्रम, यांचा समावेश आहे.
गेल्या काही वर्षांत स्वाक्षरी करण्यात आलेल्या व्यापार करारांची यादी परिशिष्ट I मध्ये दिली आहे. तसेच सध्या वाटाघाटी सुरू असलेल्या मुक्त व्यापार करारांची यादी परिशिष्ट II मध्ये दिली आहे.
मुक्त व्यापार करार, वस्त्रोद्योग, तयार कपडे आणि चामड्याच्या वस्तू यांसारख्या क्षेत्रांमधील उत्पादनांना बाजारपेठेत प्राधान्यपूर्ण प्रवेश मिळवून देतात. यामुळे या क्षेत्रांमधील विकास आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळते. यामागील उद्देश निष्पक्षता, परस्पर लाभ आणि सर्व संबंधित घटकांचे हित या तत्त्वांवर आधारित सर्वसमावेशक, संतुलित, व्यापक आणि न्याय्य करार करण्याचा आहे.
दोन्ही बाजूंची मानके, तांत्रिक नियमन आणि पारदर्शकता याबाबत परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी मुक्त व्यापार करारांमध्ये व्यापारातील तांत्रिक अडचणींवर उपाययोजना समाविष्ट आहेत. या तरतुदी भारतीय मालाला निर्यात बाजारपेठांमध्ये अधिक सुलभ आणि प्रभावी प्रवेश मिळण्यास साहाय्यभूत ठरतात.
सरकारने सीमापार ई-कॉमर्स निर्यातीला चालना देण्यासाठी, विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स, कारागीर आणि इतर लहान निर्यातदारांसाठी, विविध धोरणात्मक आणि सुविधा-विषयक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
Annexure I
India’s recent Free Trade Agreements (FTAs)
|
Sl.
No.
|
Name of the Agreement
|
Date of signing
|
Date of implementation
|
|
1
|
India - Mauritius Comprehensive Economic Cooperation and Partnership Agreement (CECPA)
|
22nd February, 2021
|
1st April, 2021
|
|
2
|
India-UAE CEPA
|
18th February, 2022
|
1 st May 2022
|
|
3
|
India-Australia Economic Cooperation and Trade Agreement (Ind-Aus ECTA)
|
2nd April, 2022
|
29th December 2022.
|
|
4
|
India-European Free Trade Association (EFTA) Trade and Economic Partnership Agreement (TEPA)
|
10th March 2024
|
01st October 2025
|
|
5
|
India – Oman CEPA
|
18th December 2025
|
1st June, 2026
|
|
6
|
India - UK Comprehensive Economic and Trade Agreement (CETA)
|
24th July 2025
|
15th July, 2026
|
|
7
|
India-New Zealand FTA
|
27th April 2026
|
Under ratification process
|
Note: India-European Union FTA negotiations concluded on January 27th, 2026. Also, India and the United States of America have announced on 7th February 2026 that the USA and India have reached a framework for an Interim Agreement regarding reciprocal and mutually beneficial trade (Interim Agreement). Negotiations are ongoing.
Annexure II
Free Trade Agreements/CECA/CEPA/ETCA under negotiation
- India-Eurasian Economic Union (India-EAEU) FTA
- India – Peru Free Trade Agreement
- India – Chile FTA
- India – Israel FTA
- India – Canada CEPA
- India – Maldives FTA
- India – Korea CEPA Upgraded Negotiation (Upgrade)
- India – Sri Lanka ETCA (Upgrade)
- India – Australia Comprehensive Economic Cooperation Agreement (CECA) (Upgrade)
- ASEAN - India Trade in Goods Agreement (AITIGA) (Review)
निलीमा चितळे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2287363)
आगंतुक पटल : 8