वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनांनी 2.40 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आकर्षित; 14.15 लाखाहून अधिक रोजगारांची निर्मिती

प्रविष्टि तिथि: 21 JUL 2026 7:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,21 जुलै 2026

देशाची  उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, निर्यात वाढवण्यासाठी, रोजगार निर्मिती करण्यासाठी आणि जागतिक स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी सरकारने 1.91 लाख कोटी रुपयांच्या मंजूर वित्तीय  व्ययासह 14  प्रमुख क्षेत्रांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना सुरू केल्या आहेत. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग सर्व पीएलआय योजनांच्या एकूण समन्वयासाठी आणि देखरेखीसाठी नोडल विभाग म्हणून काम करतो, तर  संबंधित प्रशासकीय मंत्रालये/विभाग त्यांच्या संबंधित योजनांच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहेत.

31 मार्च 2026 पर्यंत, पीएलआय योजनांतर्गत, 2.40 लाख कोटी रुपयांहून अधिक प्रत्यक्ष गुंतवणूक झाली आहे आणि 14.15 लाखाहून अधिक (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) रोजगारांची निर्मिती झाली आहे. गुंतवणूक आणि निर्माण झालेल्या रोजगाराचा क्षेत्रनिहाय तपशील 'परिशिष्ट-1' मध्ये दिला आहे.

विविध क्षेत्रांवर उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनांचा पडलेला क्षेत्रनिहाय प्रभाव खालीलप्रमाणे आहे:

पीएलआय योजनांनी त्यांच्या प्रारंभापासून आतापर्यंत एकूण 15.2 लाख कोटी रुपयांहून अधिक निर्यात शक्य केली आहे, ज्यामधून जागतिक मूल्य साखळीसोबत भारताचे वाढते एकात्मिकरण प्रतिबिंबित होत आहे.

मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक उत्पादन होणाऱ्या क्षेत्रात, ही योजना सुरू झाल्यापासून मोबाईल फोनचे उत्पादन सुमारे 2.4 पटीने वाढले आहे. मोबाईल फोनची आयात सुमारे 77% नी घटली आहे आणि भारतात वापरल्या जाणाऱ्या सुमारे 99.2% मोबाईल फोनचे उत्पादन आता देशांतर्गत केले जात आहे. 

या योजनेअंतर्गत औषधनिर्मिती क्षेत्रात 3.64 लाख कोटी रुपयांहून अधिक विक्रीची नोंद झाली आहे.

वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीसाठीच्या  पीएलआय  योजनेमुळे सीटी स्कॅनर्स , एमआरआय सिस्टीम्स , कॅथ लॅब्स  आणि अल्ट्रासोनोग्राफी उपकरणांसारख्या प्रगत वैद्यकीय उपकरणांच्या देशांतर्गत उत्पादनाला गती मिळाली आहे.

व्हाईट गुड्ससाठीच्या पीएलआय योजनेने देशांतर्गत उत्पादनात महत्त्वपूर्ण विस्तार करण्यास मदत केली आहे. 

पीएलआय योजनांच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रांमधून होणाऱ्या एकूण निर्यातीत गेल्या तीन वर्षांत सातत्याने वाढ झाली आहे.

पीएलआय योजनांच्या अंमलबजावणीचा नियमितपणे आढावा कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिवांचा अधिकारप्राप्त गट  तसेच संबंधित प्रशासकीय मंत्रालये/विभागांद्वारे घेतला जातो. भागधारकांच्या अभिप्रायानुसार आणि अंमलबजावणीच्या अनुभवाच्या आधारे, येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यकतेनुसार काही योजनांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 

पीएलआय योजनांची परिणामकारकता वाढवण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये योजनांच्या अंमलबजावणीचा वेळोवेळी आढावा घेणे, योजनांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे सुसूत्रीकरण करणे, पात्रतेच्या काही अटी शिथिल करणे, प्रकल्प देखरेख यंत्रणा मजबूत करणे, भागधारकांशी नियमित सल्लामसलत करणे आणि सचिवांच्या सक्षमीकरण गटाद्वारे  संबंधित मंत्रालये/विभागांच्या समन्वयाने अंमलबजावणीतील अडचणींचे वेळेवर निवारण करणे यांचा समावेश आहे. योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या  वाढवणे, गुंतवणुकीला गती देणे, उत्पादन व निर्यात वाढवणे, रोजगार निर्मिती करणे आणि देशांतर्गत उत्पादन परिसंस्था मजबूत करणे हा या उपाययोजनांचा उद्देश आहे.    

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री  जितिन प्रसाद यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

ANNEXURE-I

Sl.

No.

Sectors

Cumulative Investment till March, 2026

(Rs. In crore)

Cumulative Employment till March, 2026

1

Large Scale Electronics Manufacturing -

[MeitY]

20,580

1,69,249

2

IT Hardware 2.0 - [MeitY]

908

4,859

3

Bulk Drugs - [D/o Pharma]

5,070

5,226

4

Manufacturing of Medical Devices - [D/o Pharma]

1,151

5,268

5

Pharmaceuticals Drugs -

[D/o Pharma]

45,158

1,14,880

6

Telecom & Networking Products - [D/o Telecom]

5,278

33,610

7

Food Products - [MoFPI]

9,207

3,29,200

8

Drones and Drone Components - [M/o Civil Aviation]*

595

2,650

9

White Goods – [DPIIT]

6,409

52,703

10

Automobiles          &       Auto Components – [MHI]

44,326

67,820

11

Advance Chemistry Cell (ACC) Battery– [MHI]

4,570

1,245

12

Textile Products – [M/o Textiles]

8,117

33,427

13

Specialty Steel – [M/o Steel]

23,896

14,138

14

High Efficiency Solar PV Modules (MNRE)

64,873

14,794

 

TOTAL

2,40,138

8,49,069

* Note: Indirect employment generation of 5.66 lakhs have been reported under 3 sectors (LSEM, IT Hardwar & Solar PV Modules).

*********

ANNEXURE-II

 

Financial Year

Cumulative Exports Reported under PLI Schemes

FY 2023-24

₹4.0 lakh crore

FY 2024-25

₹6.5 lakh crore

FY 2025-26

₹15.2 lakh crore

निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

 

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2287351) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali