ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

औष्णिक प्रकल्पांसाठी कोळशाची उपलब्धता

प्रविष्टि तिथि: 20 JUL 2026 6:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जुलै 2026

देशातील कोळशावर (लिग्नाइटसह) आधारित वीज निर्मिती क्षमता सुमारे 230.8 गिगावॅट असून एप्रिल ते जून 2026 या कालावधीत एकूण वीज पुरवठ्यातील तिचा वाटा 69.54% आहे. याशिवाय, सौर ऊर्जेची सर्वाधिक मागणी नसलेल्या वेळेत अशा वीज प्रकल्पांमधून सुमारे 188.8 गिगावॅट (एकूण निर्मितीच्या सुमारे 75%- 251.4 गिगावॅट) इतकी कमाल वीज निर्मिती होते.

दिनांक 12.07.2026 रोजी औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये 42.8 दशलक्ष टन (एमटी) कोळशाचा साठा उपलब्ध असून तो 85% प्लांट लोड फॅक्टरनुसार (पी एल एफ) 14 दिवसांसाठी पुरेसा आहे. तसेच, सध्या औष्णिक वीज प्रकल्पांना दैनंदिन मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा कोळसा मिळत आहे.

वेगवेगळ्या महिन्यांतील मागणीची परिस्थिती विचारात घेऊन औष्णिक युनिट्सच्या नियोजित देखभालीचे आगाऊ नियोजन केले जाते. सर्वाधिक मागणीच्या महिन्यांमध्ये नियोजित देखभाल कमीत कमी करणे ही एक प्रमाणित पद्धत आहे. वाढत्या मागणीमुळे गरज भासल्यास केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सीईए) संयंत्राच्या तांत्रिक मापदंडांच्या आधारावर संबंधित प्रकरणाचे विश्लेषण करते आणि देखभाल पुढे ढकलण्यास परवानगी देते.

भारत सरकारने मागणीच्या उच्च कालावधीत औष्णिक वीज निर्मिती अखंडित राहावी यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत:

i. आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान 9,470 मेगावॅट औष्णिक क्षमता वाढवण्यात आली आहे आणि चालू आर्थिक वर्षात आणखी 2,260 मेगावॅट क्षमतेचे कार्यान्वयन करण्यात आले आहे. औष्णिक वीज प्रकल्पांना होणाऱ्या कोळशाच्या पुरवठ्यावर सध्या ऊर्जा मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि कोळसा मंत्रालय यांच्या संयुक्त समितीमार्फत दररोज देखरेख ठेवली जात आहे.

ii. कोळसावाहू मालगाड्यांना तसेच वीज केंद्रांना कोळसा पाठवण्यासही प्राधान्य देण्यात आले आहे.

iii.औष्णिक वीज प्रकल्पांना होणाऱ्या कोळसा पुरवठ्याचा बारकाईने आढावा घेण्यासाठी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, कोळसा मंत्रालयाचे सचिव आणि ऊर्जा मंत्रालयाचे सचिव यांचा समावेश असलेली आंतर-मंत्रालयीन समिती (आय एम सी) नियमितपणे कार्यरत आहे.

iv.सौर ऊर्जा नसलेल्या तासांमध्ये औष्णिक वीज प्रकल्पांद्वारे होणाऱ्या वीज निर्मितीला पूरक म्हणून आजपर्यंत सुमारे 2,669 मेगावॅट क्षमतेच्या बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली (बीईएस एस) आणि 7,426 मेगावॅट क्षमतेचे पंप्ड स्टोरेज प्रकल्प (पीएसपी) कार्यान्वित करण्यात आले आहेत. या ऊर्जा साठवण प्रणाली सौर ऊर्जेच्या तासांमध्ये निर्माण झालेली अतिरिक्त वीज साठवतात आणि साठवलेल्या विजेचा वापर प्रामुख्याने सौर ऊर्जा नसलेल्या तासांमध्ये करतात.

ही माहिती ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.


राधिका अघोर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

 

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2286737) आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Tamil , Telugu