दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मुंबईमधील परवानाकृत सेवा क्षेत्राअंतर्गत मोबाईल नेटवर्कच्या गुणवत्तेचे मूल्यांकन केले
प्रविष्टि तिथि:
20 JUL 2026 4:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2026
ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सर्वसामान्य दूरसंचार ग्राहकांच्या माहितीसाठी 'मुंबई एलएसए' परवानाकृत सेवा क्षेत्राअंतर्गत जून 2026 मध्ये घेतलेल्या स्वतंत्र ड्राईव्ह टेस्टचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. दूरसंचार सेवा पुरवठादारांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या मोबाईल नेटवर्क सेवांच्या (व्हॉईस आणि डेटा दोन्ही) वास्तविक वेळेतील गुणवत्तेचे मूल्यांकन आणि पडताळणी करणे हा या ड्राईव्ह टेस्टचा मुख्य उद्देश आहे. या ड्राईव्ह टेस्टदरम्यान, ट्रायने कव्हरेज , कॉल ड्रॉप रेट , कॉल सेटअप सक्सेस रेट , डेटा डाऊनलोड आणि अपलोड थ्रुपुट यांसारख्या सेवा गुणवत्तेच्या प्रमुख मानकांच्या आधारे सेवा पुरवठादारांच्या कामगिरीची नोंद केली आहे. ग्राहकांना माहिती देणे आणि सेवा पुरवठादारांना त्यांच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यास प्रोत्साहित करणे हा यामागील हेतू असून त्यासाठी ही माहिती जाहीर करण्यात आली.
शहर, हॉटस्पॉट, सार्वजनिक वाहतूक केंद्रे यांसारख्या विविध वापराच्या पर्यावरणांमध्ये सर्व सेवा पुरवठादारांच्या प्रत्यक्ष स्थानावरील नेटवर्कच्या गुणवत्तेची नोंदणी करण्यासाठी या स्वतंत्र ड्राईव्ह टेस्ट तयार केल्या आहेत. या चाचणीत सर्व सेवा पुरवठादारांच्या सिम कार्ड्सचा वापर करून 2G, 3G, 4G आणि 5G नेटवर्कवर लाईव्ह डेटा आणि व्हॉईस सेशन्स स्थापित केले जातात. यासाठी एकापेक्षा जास्त प्रगत टेस्ट हँडसेट्सचा वापर केला जातो आणि प्रगत सॉफ्टवेअर सिस्टम्सद्वारे या सेशन्सचे रिअल-टाइममध्ये निरीक्षण आणि विश्लेषण केले जाते.

ट्राय ने आपल्या नियुक्त एजन्सीद्वारे, 10 जून 2026 ते 12 जून 2026 या कालावधीत मुंबई एलएसए अंतर्गत मुंबई शहरात या क्षेत्रातील प्रत्यक्ष चाचणी अर्थात ड्राईव्ह टेस्ट आयोजित केली होती. यामध्ये 204.3 किमीचा मार्ग आणि 7 हॉटस्पॉट ठिकाणांचा समावेश होता. या चाचण्या ट्रायच्या बेंगळुरू प्रादेशिक कार्यालयाच्या देखरेखीखाली घेण्यात आल्या. ड्राइव्ह टेस्ट अहवालातील निरीक्षणे ही चाचणी घेतलेल्या दिवशी आणि वेळी संबंधित मार्ग किंवा क्षेत्रावरील दूरसंचार सेवा प्रदाते यांच्या कामगिरी दाखवतात.
या आयटीडी स्वतंत्र ड्राइव्ह टेस्ट दरम्यान समाविष्ट केलेल्या मार्गाचा आणि क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-
या आय़डीटी अहवालातील निष्कर्ष संबंधित टीएसपीएस सोबत सामायिक करण्यात आले आहेत, जेणेकरून ते त्यांच्या स्तरावर पुढील आवश्यक कार्यवाही करू शकतील. आयडीटी चे सविस्तर अहवाल ट्रायच्या www.trai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोणत्याही स्पष्टीकरणासाठी किंवा अतिरिक्त माहितीसाठी, adv.bengaluru@trai.gov.in या ईमेलवर संपर्क साधता येईल किंवा ट्राय च्या बेंगळुरू प्रादेशिक कार्यालयाशी +91-80-22865004 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
परिशिष्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आशिष सांगळे/भक्ती सोनटक्के/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2286611)
आगंतुक पटल : 26