पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पारंपरिक भारतीय हस्तकला आर्थिक विकासाला कशी चालना देऊ शकते, हे सांगणारा लेख पंतप्रधानांकडून सामायिक

Posted On: 19 JUL 2026 12:57PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी लिहिलेला लेख सामायिक केला आहे.  पांरपरिक भारतीय हस्तकला आर्थिक विकासाला कशी चालना देऊ शकते, हे या लेखामध्ये अधोरेखित केले आहे.

'एक जिल्हा, एक उत्पादन' हा उपक्रम स्थानिक हस्तकारागीरांना बाजारपेठेत प्रवेश करण्यास, शाश्वत उपजीविका निर्मिती, वारसा जतन करण्यास आणि भारताची जागतिक स्पर्धात्मकता बळकट करण्यास मदत करत आहे.

मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमांवरून लिहिलेल्या संदेशामध्ये नमूद केले आहे,

पारंपरिक भारतीय हस्तकारागीर कशाप्रकारे नवोन्मेष आणि जागतिक भागीदारीच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना देऊ शकतात, हे केंद्रीय मंत्री @nsitharaman निर्मला सीतारामन यांनी अधोरेखित केले आहे.

'एक जिल्हा, एक उत्पादन' हा उपक्रम स्थानिक हस्तकलांना बाजारपेठ प्रवेश करण्यास शाश्वत उपजीविका निर्मिती, वारसा जतन करण्यास आणि भारताची जागतिक स्पर्धात्मकता बळकट करण्यास मदत करत आहे.

***

माधुरी पांगे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2286297) अभ्यागत कक्ष : 99